`दमणगंगा नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण करा`

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नाशिक : दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे फेरसर्व्हेक्षण करून सदर पाणी हे तुटीच्या पालखेड धरण समूहात वळविणेबाबत संबंधिताना त्वरित सूचना द्याव्यात, गोदावरी खोऱ्याच्या एकात्मिक राज्य जल आराखड्यात केलेली तरतूद वगळण्यात यावी व किमान लघू पाटबंधारे प्रकल्प घेण्यास निर्बंध घालू नयेत. नाशिक जिल्ह्यातील पाणीप्रश्नाशी संबंधित विविध योजना मार्गी लावाव्यात, अशी मागणी दिंडोरीचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे केली.

खासदार चव्हाण यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची मुंबईतील राजभवनात येथे भेट घेतली. या भेटीत त्यांनी पाणीप्रश्नाच्या अनुषंगाने विविध मागण्या केल्या. या मागण्यांना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

दमणगंगा (एकदरे) नदीजोड योजनेचे सर्वेक्षण केंद्र शासनामार्फत चालू आहे. एकदरे गाव पेठ तालुक्यातील दमणगंगा नदीवर आहे. एकदरेला लागून कादवा खोरे (पालखेड धरण समूह) आहे. त्यातील वाघाड हे धरण एकदरे धरणाच्या जवळ आहे. त्यामुळे एकदरे धरणाचे पाणी वाघाड धरणात आणणे अगदी सोयीचे आहे. त्यानंतर हे पाणी वाघाड ते करंजवण आणि नंतर करंजवण ते ओझरखेड असे प्रवाही बोगद्याद्वारे पाणी पालखेड समूहात आणता येईल. पालखेड समूहाची सिंचन क्षमता ७० हजार हेक्टर आहे. पालखेड धरण समूह हे तुटीचे खोरे आहे. यातील धरणे दरवर्षी भरत नाहीत. सदर तूट भरून काढण्यासाठी वरीलप्रमाणे योजना केल्यास दिंडोरी, निफाड, चांदवड, नांदगांव, येवला व अवर्षणप्रवण तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सुटू शकेल, असे त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com