agriculture news in marathi Demand rises in nursery for vegetable buddings | Agrowon

रोपवाटिकांमध्ये सणासुदीतच लगीनघाई; भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढ

राजकुमार चौगुले
गुरुवार, 19 नोव्हेंबर 2020

महाराष्ट्रातील रोपवाटिकांमध्ये ऐन सणासुदीतच लगीनघाई सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना आता रोपांच्या मागणीसाठी वाट पाहावी लागत आहे. मागणी दुपटीने वाढली आहे.

कोल्हापूर : ऑक्‍टोबरमध्ये दैना केलेल्या पावसाचे सकारात्मक परिणाम आता भाजीपाल्याच्या लागवडीवर होत आहे. पंधरा दिवसांपासून राज्यात सर्वत्र पाऊस थांबल्याने वाफसा जलद येत आहे. यामुळे शेतकरी भाजीपाल्याच्या लागवडीकडे वळत आहे. सध्या भाजीपाल्याचे दर चांगले असल्याने भाजीपाल्याला लागवडीला पसंती दिली जात आहे. यामुळे कोरोनाच्या काळात सहा महिने शांतता अनुभवणाऱ्या पश्‍चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांमध्ये ऐन सणासुदीतच लगीनघाई सुरू झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना आता रोपांच्या मागणीसाठी वाट पाहावी लागत आहे. बहुतांशी प्रमुख भाजीपाल्याच्या रोपांची मागणी गेल्या पंधरा दिवसांपासून दुपटीने वाढली आहे.

राज्यातील विविध भागांत पश्‍चिम महाराष्ट्रातील रोपवाटिकांमधून रोपांची विक्री होते. कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून भाजीपाला उत्पादक सातत्याने नुकसानीत येत आहे. यामुळे रोपवाटिकांमधूनही मागणी मोठ्या प्रमाणात घटली होती. भाजीपाल्याला दर नसल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड घटविली. सप्टेंबरपासून भाजीपाल्याची चणचण भासत असतानाच ऑक्टोबरमध्ये अवकाळीच्या तडाख्याने उपलब्ध असणारा भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले. यामुळे ऑक्टोबरच्या शेवटच्या सप्ताहापासून बहुतांशी भाजीपाल्याचे दर विक्रमी पातळीवर पोचले. याचा चांगला परिणाम शेतकऱ्यांच्या भाजीपाला लागवड करण्याच्या मानसिकतेवर झाला.

जोरदार पावसाने नुकसान झाले असले तरी दुष्काळी पट्ट्यातील विहिरी, कूपनलिका आदी स्रोत मजबूत झाले. पाण्याची उपलब्धता वाढल्याने या पट्ट्यातील शेतकरीही भाजीपाला पीक घेण्याकडे वळत आहे. यामुळे भाजीपाला रोपांच्या मागणीत मोठी वाढ दिसून येत असल्याचे रोपवाटिकाचालकांनी सांगितले. सध्या टोमॅटो, फ्लॉवर, ढोबळी मिरची, वांगी, दोडका, कोबी आदी भाजीपाल्यांच्या रोपांना शेतकऱ्यांकडून जास्त मागणी आहे. यामुळे ॲडव्हान्स घेऊन रोपांचा पुरवठा करण्याचे नियोजन रोपवाटिकाचालक करीत आहेत. पुढील पंधरा दिवसांचे रोपांचे बुकिंग करून त्या दृष्टीनेच रोपे तयार करण्यात येत असल्याचे रोपवाटिकाचालकांनी सांगितले.

प्रतिक्रिया...
कोविड संकटानंतर पहिल्यांदाच आम्ही रोपांच्या मागणीतील वाढ अनुभवत आहोत. राज्यात ज्या ठिकाणी दुष्काळ असतो. तेथेही शेतकरी भाजीपाला लागवडीस प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. परिणामी, भाजीपाला पट्ट्यातील शेतकऱ्यांबरोबर दुष्काळी भागातील शेतकरीही भाजीपाला रोपांची मागणी करीत आहेत. मागणी इतकी रोपे देणे आम्हाला कठीण होत आहे.
- शिवाजीराव कचरे, रोपवाटिका चालक, तमलदगे, जि. कोल्हापूर 
 


इतर अॅग्रो विशेष
निर्यातीसाठी संत्रा आंबटच!  सुमारे पाच वर्षांपूर्वी बांगलादेशने...
हळद लागवडीसाठी ट्रॅक्टरचलित यंत्रात...नांदेड जिल्ह्यात हळदीकडे नगदी पीक म्हणून शेतकरी...
फळपीक विमा योजनेत त्रुटी, गोंधळसोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
खर्च, जोखीम करणारे नागरे यांचे तीनमजली...शिवणी आरमाळ (जि.. बुलडाणा) येथील कैलास नागरे...
पूर्वहंगामी द्राक्षाचे विमा कवच चारपट...नाशिक : गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे...
‘एचटीबीटी’ बियाण्याची पाळेमुळे...पुणे ः देशात अवैध तणनाशक सहनशील ‘एचटीबीटी’ कापूस...
डाळिंब विमा अर्जासाठी १४ जुलैपर्यंत...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित...
कांदा व्यापाऱ्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची...
संत्रा आयात शुल्क कपातीसाठी प्रयत्न करा...नागपूर : विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या...
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...