Agriculture news in Marathi Demand for Rs 2 lakh for damaged shepherds | Agrowon

नुकसानग्रस्त मेंढपाळांना दोन लाखांच्या मदतीची मागणी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

भंडारा ः जिल्ह्यात नुकतीच वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. यावेळी जैतपूर (बारव्हा) येथील मेंढपाळांच्या तबेल्यावर वीज पडून १५ शेळ्यांचा मृत्यू झाला होता. या मेंढपाळांना दोन लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीने केली आहे.

भंडारा ः जिल्ह्यात नुकतीच वादळीवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. यावेळी जैतपूर (बारव्हा) येथील मेंढपाळांच्या तबेल्यावर वीज पडून १५ शेळ्यांचा मृत्यू झाला होता. या मेंढपाळांना दोन लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी धनगर समाज संघर्ष समितीने केली आहे.

भंडारा तहसीलदार संतोष महाले यांना या विषयीचे निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धनगर समाज विखुरलेला आहे. त्यांचा परंपरागत शेळी-मेंढीपालनाचा व्यवसाय ते करतात. शेतात शेळ्या-मेंढ्या बसवून मिळेल त्या मोबदल्यात पोटाची खळगी भरतात. खरिपापूर्वी हा समाज भटकंतीवर निघतो. लाखांदूर तालुक्‍यातील किन्ही येथे विश्‍वनाथ भेंडारकर यांच्या शेतात त्यांचे बस्तान होते.

रात्रीला अचानक चक्रीवादळ, अवकाळी पाऊस झाला. याच दरम्यान वीज कोसळून १५ शेळ्यांचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे आधीच अडचणीत आलेल्या मेंढपाळांवर यामुळे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त निलेश गोमासे, पुरुषोत्तम कोरे, गोवर्धन नागोसे, चोपराम पंधरे, प्रमोद पडारे यांना १५ शेळ्यांची भरपाई म्हणून २ लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी आहे.

धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाध्यक्ष राजकुमार मरठे, अनिल घोरपडे, प्रकाश हातेल, मारोती गोमासे, गिरधर पडारे, सोनू हातेल, अशोक टापरे, अनिकेत घोरपडे, दिनेश घोरपडे, दिनेश वावरे ज्योती टापरे, प्रतिभा गोमासे, वनिता टापरे, माधवी टापरे यांनी हे निवेदन दिले.


इतर ताज्या घडामोडी
स्वामीनाथन सूत्रानुसार हमीभाव दिल्याचा...नाशिक: स्वामीनाथन सुत्राप्रमाणे उत्पादन खर्च...
उस्मानाबाद, लातूर, बीडमध्ये पावसाचा जोर औरंगाबाद : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात बुधवारी (...
नगरच्या ४० महसूल मंडळांत जोरदार पाऊसनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी (ता.३)...
परभणी, नांदेड, हिंगोलीत पावसामुळे कापूस...परभणी : परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात गेल्या...
बुलडाण्यात पीककर्जाचे ७ टक्केच वाटप बुलडाणा : पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या...
कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभर संततधार...कोल्हापूर : जिल्ह्यात दिवसभर संततधार पाऊस सुरूच...
निसर्ग चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्याला...पुणे : निसर्ग चक्रीवादळाचा जिल्ह्यालाही फटका...
नाशिकच्या पूर्व भागात वादळामुळे नुकसान नाशिक : जिल्ह्यात बुधवार (ता.३) सकाळपासून सर्वदूर...
सांगली जिल्ह्यात बरसला मुसळधार सांगली : कोकणचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या...
विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाची...नागपूर : विदर्भात सर्वदूर मान्सूनपूर्व पावसाने...
साताऱ्यात वाऱ्यासह मुसळधार पाऊस सातारा : जिल्ह्यात बुधवारी सकाळापासून...
‘निसर्ग’मुळे रत्नागिरी जिल्ह्यात...रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात...
भाटी मिऱ्या समुद्रात नांगरलेली जहाज...चिपळूण, रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा जोरदार...
जीएम पिकांच्या मान्यतेसाठी केंद्राकडे...नागपूर: जागतिकस्तरावर जीएम पिकांच्या लागवडीस...
विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदार ...नाशिक: राज्यातील स्वस्त धान्य दुकानदार व...
मका खरेदी तातडीने सुरू कराबुलडाणा ः मोताळा तालुक्‍यात मागील दहा दिवसांपासून...
शेतकऱ्यांना त्रास झाल्यास भाजप आंदोलन...अकोला ः शेतकऱ्यांना बी-बियाणे, कर्जपुरवठा तसेच...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच सिंधुदुर्ग: जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही...
जादा खरेदी दर, नापासच्या अधिक ...अकोला ः महाबीजने सोयाबीन वाणाच्या प्रमाणित...
ऊस उत्पादक केंद्राचे वैरी आहेत काय? कोल्हापूर: केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या...