Agriculture news in Marathi Demand of Rs. 214 crore for Amravati district | Agrowon

अमरावती जिल्ह्यासाठी २१४ कोटींची मागणी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑक्टोबर 2020

संततधार पाऊस, ढगाळ वातावरण, कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात सुमारे दोन लाख ९१ हजार ५८४ एकर क्षेत्रावरील खरीप पिके व फळपिकांचे नुकसान झाले. त्यापोटी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे २१४ कोटी ३६ लाख ९२ हजार दोनशे पन्नास रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.

अमरावती : संततधार पाऊस, ढगाळ वातावरण, कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात सुमारे दोन लाख ९१ हजार ५८४ एकर क्षेत्रावरील खरीप पिके व फळपिकांचे नुकसान झाले. त्यापोटी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे २१४ कोटी ३६ लाख ९२ हजार दोनशे पन्नास रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.

जुलै महिन्यापासून पावसाने उसंतच दिली नाही. पाऊस नसलेल्या काळात ढगाळ वातावरण कायम होते.  याचा फटका तूर, मूग, उडीद, सोयाबीन, संत्रा  आणि आता कपाशी पिकाला बसला आहे. कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.  नैसर्गिक आपत्तीमुळे खरिपातील अर्ध्याअधिक पिकाचे नुकसान झाले. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संयुक्त सर्वेक्षणासह पंचनाम्याचे आदेश यंत्रणेला दिले होते.

सर्वेक्षण व पंचनाम्यानंतर  नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला. त्यानुसार ३ लाख ३० हजार ६० शेतकऱ्यांच्या २७७१७०.३५ हेक्टर क्षेत्रांतील पिकासाठी १८८,४७,५८,३८० रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ३२३ शेतकऱ्यांचे ११७.६३ हेक्टरमधील बघायची पिकांचे नुकसान झाले त्यासाठी १५,८७,८७० रुपयांची मागणी केली आहे. २०२१३ शेतकऱ्यांच्या १४२९७ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाले त्यापोटी २५,७३,४६,००० रुपयांची मागणी करण्यात आली आहे. त्यानूसार एकूण ३२२५९६ शेतकऱ्यांचे २९१५८४.९७ हेक्टर वरील २१४,३६,९२,२५८ रुपयांचे नुकसान झाले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत हे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.


इतर बातम्या
बुडून गेलं रान देवा, वाहून गेलं शिवार...कोल्हापूर : उसवलं गणगोत सारं, आधार कुनाचा न्हाई...
अतिवृष्टीचा मराठवाड्यात २३ लाख हेक्टरला...औरंगाबाद : यंदा खरिपात अतिवृष्टी व सततच्या...
केळी पीक विम्याबाबत आज बैठकजळगाव ः हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत केळी...
चढ्या दराने कांदा बियाणे विक्री पडली...नाशिक : सध्या कांद्याच्या बियाण्यांचा मोठ्या...
केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांना ‘बोनस’...नवी दिल्ली : कोरोनासंकटामुळे महागाई भत्ता...
कृषी क्षेत्रात ‘पंदेकृवि’ची भरीव...अकोला ः कृषी विद्यापीठाने कृषी क्रांतीचे प्रणेते...
राज्यात पावसाचा प्रभाव कमी झालापुणे ः राज्यात गेल्या काही दिवस जोरदार पाऊस...
राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊसपुणे ः राज्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ः मुख्यमंत्री...उस्मानाबाद : खचून जाऊ नका, धीर धरा, शासन पूर्ण...
सरकारची शेतकऱ्यांना कोरडी आश्‍वासने :...जिंतूर, जि. परभणी, हिंगोली ः अतिवृष्टीमुळे...
एकनाथ खडसे उद्या ‘राष्ट्रवादी’तमुंबई : भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या...
नगर जिल्ह्यात पिकांचे ६३ हजार हेक्टरवर...नगरः सप्टेंबर महिन्यातील सलगच्या २० दिवसांच्या...
शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये...
सातारा जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टर...सातारा : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील...
वर्धा जिल्ह्यात यंदा ६४ टक्के पीक...वर्धा  :  कर्जमाफी आणि शासनाच्या...
कासोळा फाट्यावर ‘स्वाभिमानी’चा रास्ता...यवतमाळ :  शेतकऱ्यांच्या विविध...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष बागांची छाटणी...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टीमुळे...
रत्नागिरीत सप्टेंबरमध्ये ३४ हेक्टर...रत्नागिरी ः मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात...
जळगाव जिल्ह्यात मुबलक पाणीजळगाव :  जळगाव जिल्ह्यातील मोठ्या व...
इगतपुरी तालुक्यात पावसामुळे २८५२...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या...