अमरावतीमधील तीन लाख हेक्‍टरसाठी २१४ कोटींची मागणी

संततधार पाऊस, ढगाळ वातावरण, कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात सुमारे दोन लाख ९१ हजार ५८४ एकर क्षेत्रावरील खरीप पिके व फळपिकांचे नुकसान झाले. त्यापोटी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे २१४ कोटी ३६ लाख ९२ हजार दोनशे पन्नास रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.
Demand of Rs 214 crore for three lakh hectares in Amravati
Demand of Rs 214 crore for three lakh hectares in Amravati

अमरावती : संततधार पाऊस, ढगाळ वातावरण, कीडरोगाचा प्रादुर्भाव यामुळे जिल्ह्यात सुमारे दोन लाख ९१ हजार ५८४ एकर क्षेत्रावरील खरीप पिके व फळपिकांचे नुकसान झाले. त्यापोटी एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे २१४ कोटी ३६ लाख ९२ हजार दोनशे पन्नास रुपयांच्या भरपाईचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला पाठविला आहे.

खरीप हंगामाच्या सुरुवातीला जून महिन्यात पावसाने हजेरी लावली. त्यानंतर काही काळ खंड दिला. जुलै महिन्यापासून मात्र पावसाने उसंतच दिली नाही. पाऊस नसलेल्या काळात ढगाळ वातावरण कायम होते. याचा फटका तूर, मूग, उडीद, सोयाबीन आणि आता कपाशी पिकाला बसला आहे. कपाशीवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले. नैसर्गिक आपत्तीमुळे खरिपातील अर्ध्याअधिक पिकाचे नुकसान झाले. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी संयुक्त सर्वेक्षणासह पंचनाम्याचे आदेश यंत्रणेला दिले होते.

सर्वेक्षण व पंचनाम्यानंतर नुकसानीचा अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार ३ लाख ३० हजार ६० शेतकऱ्यांच्या २७७१७०.३५ हेक्टर क्षेत्रांतील पिकासाठी १८८,४७,५८,३८० रुपयांची मागणी करण्यात आली आहे. ३२३ शेतकऱ्यांचे ११७.६३ हेक्टरमधील बघायची पिकांचे नुकसान झाले त्यासाठी १५,८७,८७० रुपयांची मागणी केली आहे. २०२१३ शेतकऱ्यांच्या १४२९७ हेक्टरमधील फळपिकांचे नुकसान झाले त्यापोटी २५,७३,४६,००० रुपयांची मागणी करण्यात आली आहे. त्यानूसार एकूण ३२२५९६ शेतकऱ्यांचे २९१५८४.९७ हेक्टर वरील २१४,३६,९२,२५८ रुपयांचे नुकसान झाले आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत हे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com