राज्यात कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी 

वर्धा ः शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याबाबत सीसीआय तसेच पणन महासंघाला निर्देश देण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार अमर काळे यांनी केली आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांना याविषयावर त्यांनी निवेदन दिले.
राज्यात कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी 
राज्यात कापूस खरेदी सुरू करण्याची मागणी 

वर्धा ः शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्याबाबत सीसीआय तसेच पणन महासंघाला निर्देश देण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार अमर काळे यांनी केली आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांना याविषयावर त्यांनी निवेदन दिले. 

‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे. परिणामी खासगी आणि शासकीय कापूस खरेदी ठप्प झाली आहे. यावर्षी पावसाची संततधार असल्याने दरवर्षीपेक्षा उशीरानेचे कापूस शेतकऱ्यांच्या घरात आला. हा कापूस कित्येक शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. त्यातच खरेदी बंद झाली. 

परिणामी खरीप हंगामाकरिता लागणाऱ्या पैशाची सोय कशी करावी, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. कापूस वेचणीचे पैसे देण्यासाठी देखील त्यांच्याकडे रक्‍कम नाही. त्यातच तापमानामध्ये होणाऱ्या वाढीने देखील त्यांची चिंता वाढविली आहे. ही सारी परिस्थिती लक्षात घेता शासनाने कापूस खरेदीबाबत धोरण निश्‍चित करावे, अशी मागणी श्री. केदार यांच्याकडे करण्यात आली. खरेदीबाबत यंत्रणेला तत्काळ निर्देश देण्यात यावे, असेही माजी आमदार अमर काळे यांनी निवेदनात म्हटले आहे. 

त्यांनाही धान्य द्या  शिधापत्रिकाधारक गरजू कुटुंबांना धान्य वाटप करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. परंतु अनेक कुटुंबांकडे शिधापत्रिकाच नाही. अशांना देखील धान्याची गरज आहे. त्यामुळे त्यांचाही विचार धान्य वितरणाबाबत व्हावा, अशी मागणी अमर काळे यांनी केली आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com