टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी

रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी कडेगाव तालुक्‍यातील शेतकरी वर्गासह टेंभूच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून होत आहे.
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी Demand to start rotation of Tembhu Irrigation Scheme
टेंभूचे आवर्तन सुरू करण्याची मागणी Demand to start rotation of Tembhu Irrigation Scheme

कडेगाव, जि. सांगली  : रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचे आवर्तन सुरू करावे, अशी मागणी कडेगाव तालुक्‍यातील शेतकरी वर्गासह टेंभूच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून होत आहे.

तालुक्‍यात यंदा मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे तालुक्‍यातील भूजल पातळीत वाढ झाली होती. परंतु, आता पुन्हा विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे; तर आता रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून, तालुक्‍यात ११ हजार ९१२ हेक्‍टर इतके सरासरी क्षेत्र आहे; तर उसाचे क्षेत्रही मोठे आहे. त्यामुळे रब्बी व ऊस यासह अन्य पिकांना आता पाण्याची आवश्‍यकता आहे; तर काही ठिकाणी पाण्याअभावी पिके वाळून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. तेव्हा रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचे आवर्तन तत्काळ सुरू करावे, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. टेंभू योजनेचा टप्पा क्रमांक दोन शिवाजीनगर तलाव येथे वीजपंपांची संख्या वाढवावी. तसे केल्यास सुर्ली व कामथी या दोन्ही कालव्यांतून एकाच वेळी पाणी सोडणे शक्‍य होणार आहे. परिणामी, दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना एकाच वेळी व पूर्ण क्षमतेने समान पाणी वितरण होईल, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. ‘टेंभू' अंतर्गत घाटनांद्रे योजनेच्या कामाला गती  घाटमाथ्याला वरदान ठरणाऱ्या बहुचर्चित व कित्येक वर्षांपासून रखडलेल्या टेंभू योजने अंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेच्या कामाने काही दिवसांपासून गती घेतली आहे. त्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. टेंभू योजने अंतर्गत घाटमाथ्याला वरदान ठरणारी घाटनांद्रे उपसा सिंचन योजना ही टप्पा क्र. पाच अंतर्गत भूड येथून पाणी उचलून तामखडी, खानापूर, पळशी, घाटनांद्रे, तिसंगी, वाघोली, कुंडलापूर, गर्जेवाडी, शेळकेवाडी, केरेवाडी, जाखापूर, डोंगरसोनीला पाणी देण्यासाठी ही योजना आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com