‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रावरील शेतकऱ्यांची अडवणूक थांबवा ः `स्वाभिमानी`ची मागणी

कापूस दर्जेदार असल्याचे दाखवताना शेतकरी
कापूस दर्जेदार असल्याचे दाखवताना शेतकरी

परभणी : मानवत (जि. परभणी) येथील भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचा दर्जेदार कापूस नाकारला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे होत असलेले आर्थिक नुकसान थांबवावे, हमीभावाने कापूस खरेदी करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्याकडे केली.

मानवत येथील ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रावर मंगळवारी (ता. २६) शेतकऱ्यांचा कापूस घेऊन आलेल्या सुमारे २५० वाहनांची रांग लागली होती. परंतू, ‘सीसीआय’च्या ग्रेडरने त्यापैकी २० ते २५ वाहनांतील कापसाची खरेदी केली. इतर वाहनांतील कापूस हमीभाव खरेदीच्या निकषात बसत नसल्याचे कारण सांगत नाकारला.

यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कापूस भरलेली वाहने जिल्हाधिकारी कार्यालयात नेऊन लावण्याचा निर्णय घेतला. परंतु मानवतहून परभणी शहरात वाहने येताच पोलिसांनी ती जांब नाक्यावर अडविली. त्यामुळे किशोर ढगे, हनुमान मसलकर, मुंजाभाऊ लोडे, भास्कर खटिंग, बालू ढगे, बाबासाहेब अवचार आदींसह शेतकऱ्यांनी वाहनातील कापूस हातामध्ये घेऊन जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांची भेट घेतली. ओलाव्याचे कारण सांगत शेतकऱ्यांचा कापूस नाकारला जात असल्याची बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com