Agriculture News in Marathi Demand to stop soybean exports | Agrowon

भारतात होणारी सोयापेंड निर्यात थांबविण्याची मागणी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर बांगलादेशातून अर्जेंटिनानंतर सर्वाधिक आयात होत आहे. मात्र  बांगलादेशातील पशुखाद्य उद्योगसह पशुपालक शेतकरीही अडचणीत आलेत. 

पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड आयातीला परवानगी दिल्यानंतर बांगलादेशातून अर्जेंटिनानंतर सर्वाधिक आयात होत आहे. मात्र यामुळे बांगलादेशातील सोयापेंडचे दर १० ते १२ टका (टका बांगलादेशी चलन आहे) प्रति किलोवरून ५३ ते ५५ टकावर गेल्याने पशुखाद्य उद्योगसह पशुपालक शेतकरीही अडचणीत आले आहेत. त्यामुळे पशुखाद्य उद्योगाने बांगलादेश सरकारकडे सोयापेंड निर्यातीवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

बांगलादेशात पशुआहारात तब्बल २५ ते ३५ टक्के सोयापेंडचा वापर केला जातो. बांगलादेश सरकारने अलीकडेच सोयापेंड निर्यातीसाठी परवनागी दिली आहे. त्यातच भारतातून जनुकीय सुधारित सोयापेंडला मागणी वाढल्याने आणि निर्यातीसाठी लागणारा कमी कालावधी तसेच कमी खर्च यामुळे भारतात निर्यात वाढली आहे. मात्र त्याचा विपरीत परिणाम बांगलादेशातील उद्योगावर होत आहे. त्यामुळे येथील पशुखाद्यनिर्मिती उद्योगाच्या संघटनेने सरकारकडे निर्यातीवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी केली आहे. 

भारतातून सोयापेंडला मागणी वाढल्याने देशातील आयातदार, प्रक्रियादार आयातीचे करार करण्यास इच्छुक आहेत आणि बांगलादेश सरकारही त्यास सहमत आहे. मात्र येथील पशुखाद्य निर्मिती संघटनांचे म्हणणे आहे, की निर्यात वाढत राहिल्यास दर मोठ्या प्रमाणात वाढतील आणि पशुपालक, पोल्ट्री आणि दूध उत्पादकांचा खर्च वाढून याचा थेट परिणाम बांगलादेशातील ग्राहकांवर होईल. 

निर्यातीमुळे साठेबाजीला खतपाणी 
पशुखाद्यनिर्मिती उद्योगाच्या संघटनेने म्हटले आहे, सरकारने सोयापेंड निर्यातीला परवानगी देताच सोयापेंड उत्पादकांनी दर वाढविले आहेत. आता सोयापेंडचा दर हा १० ते १२ टकावरून ५३ ते ५४ टकांवर पोहोचला आहे. यामुळे पशुखाद्य उद्योगासोबतच शेतकरीही संकटात सापडले आहेत. तसेच दुग्धोत्पादक शेतकऱ्यांचाही खर्च वाढणार आहे. सोयाबीन प्रक्रिया उद्योगांचा पुरवठा करून करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काळात सोयापेंडचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

बांगलादेशातील उत्पादनाची स्थिती 
बांगलादेशात सोयाबीन उत्पादन खूपच कमी होते. ब्राझील आणि अर्जेंटिनातून जनुकीय सुधारित सोयाबीनची आयात करून सोयातेल आणि सोयापेंडची निर्मिती केली जाते. बांगलादेशात सोयापेंडची मागणी आणि वापर वाढल्याने सोयापेंडची तशी निर्यात होत नाही. परंतु भारतातून पहिल्यांदाच जणुकीय सुधारित सोयापेंडला मागणी वाढल्याने बांगलादेशातून निर्यातीचे करार होत आहे. गेल्या आठवड्यापर्यंत बांगलादेशातून १.२५ लाख टन सोयापेंड निर्यातीचे करार भारताबरोबर झाले आहेत. 


इतर अॅग्रोमनी
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
खाद्यतेलाच्या दराऐवजी सोयाबीन दरात मोठी...पुणे : निवडणुका आणि सणांच्या पार्श्‍वभूमीवर...
मोदीजी, तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही...अहमदाबाद, गुजरात : खरिपातील तेलबिया बाजारात...
मागणीमुळे कापसाला यंदा दराची झळाळीपुणे : कोरोनानंतरच्या काळात वाढलेली मागणी आणि...
खाद्यतेलाच्या वाढत्या दरामुळे मोहरीच्या...पुणे : खाद्यतेलाच्या वाढत्या दर आणि...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
भारतीय साखरेसाठी यंदा ‘फिलगुड’गेल्या महिन्याच्या कालावधीत साखर उद्योगासाठी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...