agriculture news in Marathi demand of sugar will be less after lockdown Maharashtra | Agrowon

लॉकडाऊननंतरही साखरेला कमी उठाव राहणार 

राजकुमार चौगुले
बुधवार, 29 एप्रिल 2020

आमच्याकडे सध्या एक महिन्याची साखर शिल्लक आहे. ३ मे नंतर उद्योग सुरु झाले, तरी शिल्लक साखर आम्हाला मे महिन्यात पुरेशी होवू शकते. जूनमध्ये मात्र जितकी मागणी असेल तितक्‍याच प्रमाणात आम्हाला साखर खरेदी करावी लागणार आहे. यामुळे आम्ही उद्योग सुरु केले तरी तातडीने साखर खरेदी करणार नाही. देशभरात बहुतांशी शीतपेय उत्पादकांची साधारणपणे अशीच स्थिती आहे. 
- प्रकाश कोळी, कोली कोला शीतपेय उत्पादक कंपनी, जयसिंगपूर, जि. कोल्हापूर 

कोल्हापूर: ऐन उन्हाळ्यातच शीतपेयांसह साखरेचा अधिक वापर करणारे उद्योग बंद राहिल्याने साखरेची विक्री ठप्प झाली आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉक डाऊन निघाला तरी साखर वापर करणारे उद्योग धीम्या गतीनेच सुरु होण्याची शक्‍यता आहे. मे महिन्यात आवश्‍यक ती साखर उद्योगाकडून खरेदी होइल की नाही याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. लॉकडाऊन पंधरा दिवस जरी वाढला तरी याचा विपरीत परिणाम साखरेची मागणी व वापरावर होण्याचे स्पष्ट संकेत उद्योगातील सूत्रांनी दिले. 

पेय, शीतपेय आणि आइस्क्रीम उत्पादकासह मिठाई बनविणारे संस्थात्मक खरेदीदार उन्हाळाच्या प्रारंभी साखरेची मागणी नोंदवतात. तब्बल ६५ ते ७० टक्के मागणी या व्यावसायिकांकडून असते. यंदाही या हालचाली सुरु असताना ऐन उन्हाळ्याच्या प्रारंभीच लॉकडाऊनचे संकट आले. कंपन्या अधिक मागणी गृहीत धरुन उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करीत असतानाच उद्योग अचानक बंद पडले. देशातील आघाडीच्या कंपन्यांनाही याचा फटका बसला. याचा परिणाम साखर उद्योगावर झाला. सध्या फक्त घरगुती वापरासाठीच मागणी आहे. ती पण अत्यल्प आहे. 

एप्रिलमध्ये पन्नास टक्केही विक्री नाही 
मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत २१ लाख साखरेची विक्री कारखान्यांनी केली होती. मार्चच्या उत्तरार्धात लॉकडाऊन सुरु झाल्याने मार्च महिन्यातील साखरेची विक्री झाली नाही. एप्रिलमध्ये १८ लाख टन साखर विक्रीचे उद्दिष्ट केंद्राकडून आलेले होते. याच्या पन्नास टक्केही विक्री कारखान्यांकडून झाली नाही. एप्रिल महिन्यात साखर विक्री ठप्प झाल्यासारखीच स्थिती आहे. मागणी, वाहतूक बंदचा जबरदस्त फटका कारखान्यांना बसला 

शिल्लक साखरेचा दबाव शक्‍य 
यंदा साखरेचे उत्पादन घटले असले तरी पुढील वर्षी साखरेच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर यंदा न विकली गेलेली साखर पुढील हंगामासाठी डोकेदुखी बनू शकते, असा अंदाज साखर उद्योगाचा आहे. शिल्लक राहिलेल्या साखरेचा दबाव पुढील हंगामावर नक्कीच विपरीत परिणाम करेल, अशी भिती एका कारखानदार सूत्रांनी व्यक्त केली. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा २० लाख टनापर्यंत साखरेचा वापर कमी होण्याची शक्‍यता साखर उद्योगातून व्यक्त करण्यात येत आहे. 
 


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
तुरीचे दर प्रतिक्विंटल सहा हजारांवरनागपूर : स्थानिक प्रक्रिया उद्योजकांकडून मागणी...
सूक्ष्मदर्शक, स्वयंचलित हवामान केंद्र...तंत्रज्ञान समजून वापर केला तर शेती सुलभ होऊ शकते...
तिढा सुटावा लवकर!मागील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात असताना राज्यात...
कांदा निर्यातबंदी आवडे सरकारलाकेंद्र सरकारने अचानक कांद्यावर निर्यातबंदी लादली...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
‘कृषी’तील ‘वतनदारी’ निवृत्तीनंतरही कायमपुणे: कृषी आयुक्तालयात वर्षानुवर्षे राखलेली ‘...
वऱ्हाडातील मोठे, मध्यम प्रकल्प तुडुंबअकोला ः वऱ्हाडात बहुतांश तालुक्यांमध्ये पावसाने...
मध्य महाराष्ट्र, कोकणात वादळी पावसाचा...पुणे ः महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवर...
पावसाचा कहर, पिकांची नासाडी सुरुचपुणे ः राज्यात पावसाचा जोर वाढतच आहे. रविवारी (ता...
सांगली : डाळिंब बागांचे ५० कोटींहून...सांगली ः डाळिंबाला अगोदर निसर्गाची साथ मिळाली...
`क्रॉपसॅप`मध्ये ३३ कोटींची कपात पुणे: कोविड १९ मुळे ग्रामीण भागात तयार झालेल्या...
पशुपालन,दूध प्रक्रियेतून वाढविला नफाशिरसोली (जि.जळगाव) येथील डिगंबर रामकृष्ण बारी...
संरक्षित शेतीतून शाश्वत उत्पादनाकडे...वाढत असलेली दुष्काळी परिस्थिती आणि बदलते हवामान...
बळीराजालाच बळी देण्याचा प्रकार?शेती क्षेत्रातील सुधारणाविषयक तीन वटहुकूम असोत...