Agriculture news in Marathi Demand for waiver of electricity bills of agricultural pumps | Agrowon

कृषीपंपांचे वीजबिल माफ करण्याची मागणी 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 एप्रिल 2020

बुलडाणा ः जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. हातावर पोट असलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही आहे. शेतीतील कामे ठप्प आहेत. या परिस्थितीतही शेतातील कृषी पंपाचे वीज बिल महावितरणने वाढवण्याचा सपाटा लावला आहे. शासनाने सध्याचा विचार करता कृषी पंप व ग्राहकांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांनी केली आहे. 

बुलडाणा ः जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन सुरू आहे. हातावर पोट असलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही आहे. शेतीतील कामे ठप्प आहेत. या परिस्थितीतही शेतातील कृषी पंपाचे वीज बिल महावितरणने वाढवण्याचा सपाटा लावला आहे. शासनाने सध्याचा विचार करता कृषी पंप व ग्राहकांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांनी केली आहे. 

याबाबत मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या मागणीत चंदन यांनी म्हटले की, या लॉकडाऊनमुळे शेतकरी फार मोठ्या आर्थिक संकटात आहे. यामुळे शेतकरी आज रोजी शेतातील वीज बिल भरू शकत नाही. तसेच ग्राहकांचे घरगुती बिलसुद्धा वाढवण्याचा सपाटा सुद्धा महावितरणने लावला आहे. ग्राहकांवरसुद्धा आर्थिक संकट आल्याने ते सुद्धा बिल भरू शकत नाही. या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचण फार वाढली आहे. जून महिन्यामध्ये शेतीचा हंगाम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विहिरीला पाणी आहे. परंतु काही ठिकाणी विजेची कमतरता आहे. महावितरणने शेतकऱ्यांना व ग्राहकांना वीजबिल वाढ करून एक प्रकारे शेतकरी व ग्राहकांवर अन्याय केला आहे. शेतकऱ्यांच्या व ग्राहकांच्या या गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष देऊन शेतकऱ्याच्या कृषीपंपाचे वीज बिल सरसकट माफ करावे व ग्राहकांचे तीन महिन्यांचे घरगुती वीज बिल माफ करावे, अशी मागणी केली आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...