धरणांतील पाण्याची मागणी वाढली

उन्हाचा चटका वाढू लागल्याने धरणांतील पाण्याची मागणी ही वाढू लागली आहे. धरणांतील उपलब्ध असलेली पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. आतापर्यंत सुमारे १०४.९५ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला असून अजूनही १०८.१८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
Demand for water from dams increased
Demand for water from dams increased

पुणे ः उन्हाचा चटका वाढू लागल्याने धरणांतील पाण्याची मागणी ही वाढू लागली आहे. धरणांतील उपलब्ध असलेली पाणीपातळी झपाट्याने कमी होत आहे. आतापर्यंत सुमारे १०४.९५ टीएमसी पाणीसाठ्याचा वापर झाला असून अजूनही १०८.१८ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई कमी भासण्याची शक्यता जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

चालू वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झाली होती. पुणे जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणे भरली असून एकूण २१३.१३ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा झाला होता. यामध्ये उजनी धरणाचाही समावेश आहे. गेल्या फेब्रुवारीच्या अखेरपासून उन्हाचा पारा हळूहळू वाढू लागल्याने पाण्याची गरज अधिक प्रमाणात गरज भासू लागली. उजनी धरण वगळता उर्वरित सर्वच धरणे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात आहे. त्यातच पुणे व पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेतली असता या दोन्ही शहरांना खडकवासला, चासकमान, पवना या धरणांतून पाण्याचा पुरवठा होतो.

याशिवाय पूर्वेकडील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, खेड, शिरूर, जुन्नर आणि आंबेगाव या पूर्व भागातील तालुक्यांना पश्चिमेकडील धरणातून शेतीसाठी पाण्याचा विसर्ग सोडला जातो. सध्या पिंपळगाव जोगे, डिंभे, घोड, चासकमान, खडकवासला, वीर, नाझरे, उजनी या धरणातून पाण्याचा उजव्या आणि डाव्या कालव्यांना पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. याशिवाय वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणातून बंद जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे पाणीपातळी वेगाने कमी होत आहे. धरणात अजूनही पाणीसाठा झाला असला तरी एप्रिल ते मे महिन्यात या दोन महिन्यात पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे.

धरणनिहाय उपलब्ध असलेला पाणीसाठा, टीएमसीमध्ये ः पिंपळगाव जोगे ०.४२, माणिकडोह ०.९७, येडगाव ०.६८, वडज ०.६६, डिंभे ६.६३, घोड २.५३, विसापूर ०.३९, कळमोडी १.४४, चासकमान ४.०४, भामाआसखेड ५.६०, वडिवळे ०.४१, आंध्रा २.२४, पवना ४.५०, कासारसाई ०.३३, मुळशी ६.०२, टेमघर ०.४६, वरसगाव ७.४६, पानशेत ७.६४, खडकवासला ०.९४, गुंजवणी २.००, नीरा देवधर ५.७६, भाटघर १४.४८, वीर ५.५१, नाझरे ०.३८, उजनी २६.४०, चिल्हेवाडी ०.२९.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com