बाधितांसाठी मागितले दहा कोटी अन्‌ मिळाले अडीच कोटी

The demands for the disadvantages amounted to ten crore and got two and half crore
The demands for the disadvantages amounted to ten crore and got two and half crore

आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी तालुक्‍यात रब्बी आणि फळ पिकासह विविध पिकांचे तीनशे कोटींवर नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी सरकारकडे केली होती. मात्र, दोन कोटी ४१ लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. 

आटपाडी तालुक्‍यात या वर्षी पहिल्यांदाच एकाच वर्षात प्रचंड तीव्र दुष्काळ आणि अतिवृष्टी याचा अनुभव शेतकऱ्यांना आला. ऑक्‍टोबर महिन्यात तीन वेळा ४५ मिलिमीटरवर पाऊस पडला. मोठी अतिवृष्टी झाली. गावोगावचे ओढे तुडुंब भरून पुलावरून पाणी वाहू लागेल. अनेक पूल वाहून गेले. शेतात जिकडे बघेल तिकडे पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. त्यासोबतच डाळिंब आणि द्राक्ष बागा, भाजीपाला आणि कांदा पिकांचेही अतोनात नुकसान झाले. 

महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तपणे पंचनाम्याची मोहीम राबवली. यामध्ये तालुक्‍यात साडेसात हजार हेक्‍टर खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच दोन हजार हेक्‍टर डाळिंब, सातशे हेक्‍टर द्राक्षे, भाजीपाला आदी पिकांचेही नुकसान झाल्याचे पंचनाम्याच्या माहितीतून उघड झाले. जवळपास तीनशे कोटी रुपयांवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारने खरीप पिकासाठी हेक्‍टरी आठ आणि फळपिकासाठी १८ हजारांची नुकसानभरपाई जाहीर केली. नुकसानीच्या तुलनेत ही भरपाई अत्यंत तोडकी आहे. 

नुकसान तीनशे कोटींचे, घोषणेनुसार महसूल विभागाने सरकारकडे दहा कोटी रुपये मागितले आणि मिळाले दोन कोटी ४१ लाख रुपये. या मदतीचे एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना वाटप करता येत नाही. दिघंची आणि इतर काही गावांत मदतीचे वाटप केले. उर्वरित आटपाडी, करगणी, शेटफळे, खरसुंडी हा परिसर मदतीपासून अद्याप वंचित आहे. या भागातील शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. ती तातडीने द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सरसकट नुकसानभरपाई द्यावी  शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी पंचनामे केले नाही. काही मोजक्‍याच शेतकऱ्यांनी पंचनामे केले आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा निर्माण झाली आहे तर ज्यांचे पंचनामे केले नाहीत ते वंचित राहणार आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील सर्वच शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com