Agriculture news in Marathi The demands for the disadvantages amounted to ten crore and got two and half crore | Agrowon

बाधितांसाठी मागितले दहा कोटी अन्‌ मिळाले अडीच कोटी

टीम अॅग्रोवन
सोमवार, 9 डिसेंबर 2019

आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी तालुक्‍यात रब्बी आणि फळ पिकासह विविध पिकांचे तीनशे कोटींवर नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी सरकारकडे केली होती. मात्र, दोन कोटी ४१ लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. 

आटपाडी, जि. सांगली ः अवकाळी पावसामुळे आटपाडी तालुक्‍यात रब्बी आणि फळ पिकासह विविध पिकांचे तीनशे कोटींवर नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी १० कोटी रुपयांची मागणी सरकारकडे केली होती. मात्र, दोन कोटी ४१ लाख रुपये मिळाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. 

आटपाडी तालुक्‍यात या वर्षी पहिल्यांदाच एकाच वर्षात प्रचंड तीव्र दुष्काळ आणि अतिवृष्टी याचा अनुभव शेतकऱ्यांना आला. ऑक्‍टोबर महिन्यात तीन वेळा ४५ मिलिमीटरवर पाऊस पडला. मोठी अतिवृष्टी झाली. गावोगावचे ओढे तुडुंब भरून पुलावरून पाणी वाहू लागेल. अनेक पूल वाहून गेले. शेतात जिकडे बघेल तिकडे पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाले. त्यासोबतच डाळिंब आणि द्राक्ष बागा, भाजीपाला आणि कांदा पिकांचेही अतोनात नुकसान झाले. 

महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तपणे पंचनाम्याची मोहीम राबवली. यामध्ये तालुक्‍यात साडेसात हजार हेक्‍टर खरीप पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच दोन हजार हेक्‍टर डाळिंब, सातशे हेक्‍टर द्राक्षे, भाजीपाला आदी पिकांचेही नुकसान झाल्याचे पंचनाम्याच्या माहितीतून उघड झाले. जवळपास तीनशे कोटी रुपयांवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. राज्य सरकारने खरीप पिकासाठी हेक्‍टरी आठ आणि फळपिकासाठी १८ हजारांची नुकसानभरपाई जाहीर केली. नुकसानीच्या तुलनेत ही भरपाई अत्यंत तोडकी आहे. 

नुकसान तीनशे कोटींचे, घोषणेनुसार महसूल विभागाने सरकारकडे दहा कोटी रुपये मागितले आणि मिळाले दोन कोटी ४१ लाख रुपये. या मदतीचे एकाच वेळी सर्व शेतकऱ्यांना वाटप करता येत नाही. दिघंची आणि इतर काही गावांत मदतीचे वाटप केले. उर्वरित आटपाडी, करगणी, शेटफळे, खरसुंडी हा परिसर मदतीपासून अद्याप वंचित आहे. या भागातील शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. ती तातडीने द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

सरसकट नुकसानभरपाई द्यावी 
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी पंचनामे केले नाही. काही मोजक्‍याच शेतकऱ्यांनी पंचनामे केले आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळण्याची आशा निर्माण झाली आहे तर ज्यांचे पंचनामे केले नाहीत ते वंचित राहणार आहेत. त्यामुळे तालुक्‍यातील सर्वच शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.


इतर ताज्या घडामोडी
कृषी कायदे शेतकऱ्यांना गुलाम करणारे :...नागपूर : केंद्रातील भाजप सरकारने लोकशाही आणि...
कोरोना लसीकरण क्रांतिकारक पाऊल : ...मुंबई : कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक...
सातारा जिल्ह्यात रब्बीची ९५ टक्के...सातारा : जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पेरणीची कामे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत गहू...औरंगाबाद : तीन जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात...
सांगलीत कारखानदारांनी एफआरपीचा केला...सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर...
बँकांनी पीक कर्जवाटप वेळेत पूर्ण करावे...नगर:  ‘‘जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी बँकांना...
सांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र...सांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५...
सांगली जिल्हा बॅंकेसह १७३ संस्थांच्या ...सांगली : सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे...
नाशिकला मका खरेदीसाठी ५६ हजार क्विंटलचे... येवला : केंद्र शासनाच्या परवानगीनंतर ही...
नांदेड जिल्ह्यात मतदानासाठी केंद्रांवर...नांदेड ः जिल्ह्यातील ९०७ ग्रामपंचायतींसाठी...
नाशिकमध्ये उत्साहात ग्रामपंचायतींचे...नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५...
गोसेखुर्द प्रकल्पासाठी भूसंपादनाचा तिढा...नागपूर : पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान...
नव्या परवानगीमुळे मका उत्पादकांचा जीव...बुलडाणा : राज्यात सर्वाधिक मका खरेदी झालेल्या...
राज्यात कृषी पीएचडीची प्रवेश प्रक्रिया...पुणे ः राज्याच्या चारही कृषी विद्यापीठांमधील...
खानदेशात मका दरात सुधारणाजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
सकाळी सौम्य थंडी; दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका कमी हवेचा...
डाळिंब बागांसाठी पाण्याचे व्यवस्थापनजानेवारी अखेरपासून पाण्याची उपलब्धता कमी होत जाते...
औरंगाबादमध्ये मोसंबीला सर्वसाधारण ३०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गहू संशोधनात सर्वांचाच वाटा ः डाॅ. ढवणनाशिक :  येथील गहू संशोधन केंद्रास डॉ....
कोल्हापुरात सकाळपासूनच मतदारांच्या...कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीने...