agriculture news in marathi, demands of farmers to give a loan waiver, satara, maharashtra | Agrowon

पीक नुकसानभरपाई नको; संपूर्ण कर्जमाफीच देण्याची मागणी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती नव्हती ती सारी पिकं गेली. आता पीक उगवून येणारच नाही. नुकसान लाखात आणि भरपाई शेकड्यात अशी स्थिती शासन करणार. त्यामुळं मदत देण्याऐवजी आता नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी कृषिमंत्री डाॅ. अनिल बोंडे यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्री संवेदनशील असून, भरीव भरपाई देण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन मंत्री डॉ. बोंडे यांनी शेतकऱ्यांना दिले. 

कऱ्हाड, जि. सातारा   ः महापुराने हुती नव्हती ती सारी पिकं गेली. आता पीक उगवून येणारच नाही. नुकसान लाखात आणि भरपाई शेकड्यात अशी स्थिती शासन करणार. त्यामुळं मदत देण्याऐवजी आता नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी कृषिमंत्री डाॅ. अनिल बोंडे यांच्याकडे केली. शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी मुख्यमंत्री संवेदनशील असून, भरीव भरपाई देण्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन मंत्री डॉ. बोंडे यांनी शेतकऱ्यांना दिले. 

सातारा जिल्ह्यातील अपवाद वगळता सर्वच तालुक्यांना महापुराचा फटका बसला. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री डॉ. बोंडे सोमवारी सातारा जिल्ह्यातील मालखेड (ता. कऱ्हाड) येथे आले होते. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कृषी संचालक एन. टी. शिसोदे, कोल्हापूर विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, प्रांताधिकारी हिंमत खराडे, तहसीलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पवार, सातारा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, सांगलीचे कृषी अधीक्षक राजेंद्र साबळे, उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात आदी या वेळी उपस्थित होते.

महापुराने पिके पूर्णतः वाया गेली आहेत. आता पुन्हा पिके उगवणार नसल्याने शेतकऱ्यांपुढे मोठी आर्थिक अडचण आहे. पिकेही नाहीत आणि कर्जही अंगावर अशी स्थिती झाली आहे. शिवारातील पिके काढण्यासाठीही शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. जे धान्य काढले होते, घरात होते त्याचेही भिजून नुकसान झाले आहे. अनेकांचे वीज पंप वाहून गेले आहेत. अनेकांच्या जमिनी वाहून गेल्या आहेत. त्याचबरोबर ठिबक संचांचीही मोडतोड झाली आहे. त्याचा विचार करून शासनाने आम्हाला संपूर्ण कर्जमाफी द्यावी तरच सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकरी पुन्हा उभा राहील अशी मागणी केली. 

या वेळी मंत्री डॉ. बोंडे म्हणाले, की शेतकऱ्यांच्या वेदना पाहून दुःख होत आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या असलेले पीक हाती लागणार नाही. त्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच्या पायांवर उभे केले पाहिजे. यासाठी शासनाच्या धोरणानुसार शेतकऱ्यांना मदत केली जाईल. जेवढ्या पिकांचे नुकसान झालेले आहे त्या सर्व पिकांचे पंचनामे करून शासनास सादर करा, असेही आदेश डॉ. बोंडे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिले. 
 
शेतकऱ्यांना जुन्या दराऐवजी प्रचलित दराप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. वाढता खर्च आणि झालेले नुकसान याचा विचार करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई देण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासंदर्भात मुख्यमंत्रीही सकारात्मक आहेत, असे डॉ. बोंडे यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...
पोल्ट्री उद्योगाला हवा मदतीचा हातपुणे: बाजारभावातील नरमाईमुळे पोल्ट्री उद्योग...
हापूस निर्यातीसाठी निर्यातीसाठी पणन...रत्नागिरी ः निर्यातीत हापूसचा टक्का घसरत असून तो...
नीरा देवधर, गुंजवणीतून समन्यायी पाणीवाटपमुंबई ः नीरा देवघर व गुंजवणी धरणांचे कालवे...
तापमानवाढीचा धोका वेळीच ओळखावा लागेल:...औरंगाबाद: निसर्गाच्या दोलायमानतेत मानवी...
नगरमधील नऊ तालुक्यांत तेलबियांची पेरणीच...नगर ः तेलबियांची (गळीत धान्य) पेरणी वाढावी यासाठी...
सातारा जिल्ह्यात ५५ लाख क्विंटल...सातारा : जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या गाळपाची...