Agriculture news in Marathi Demons mediate in soybean seed dispute | Agrowon

सोयाबीन बियाणे वादात दानवेंची मध्यस्थी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध लावणाऱ्या मध्य प्रदेशाच्या भूमिकेमुळे तयार झालेल्या वादात केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्थी करीत कृषी आयुक्तांकडून माहिती घेतली. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध लावणाऱ्या मध्य प्रदेशाच्या भूमिकेमुळे तयार झालेल्या वादात केंद्रीय अन्न पुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मध्यस्थी करीत कृषी आयुक्तांकडून माहिती घेतली. याबाबत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सोयाबीन बियाण्याचा मुख्य पुरवठा मध्य प्रदेशातून होतो. मात्र, यंदा तेथेही कमी बियाणे असल्याने स्थानिक शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी राज्याबाहेर बियाण्यांची विक्री करण्यास मध्य प्रदेश कृषी विभागाने निर्बंध आणले आहे. यामुळे महाराष्ट्रात येणारे ८ ते १० लाख क्विंटल बियाणे अडकून पडले आहे. राज्य शासनाने याबाबत केंद्राकडेही तक्रार केल्याने हा वाद अजूनही धुमसत आहे. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड्‍स सीड्‍स असोसिएशनने (माफदा) जगन्नाथ काळे यांच्या नेतृत्वाखाली श्री. दानवे यांच्याशी मंगळवारी (ता. ४) चर्चा केली.

कृषी आयुक्तांशी चर्चा
बियाण्यांबाबत काही मुद्दे गंभीर असल्याचे लक्षात येताच श्री. दानवे यांनी कृषी आयुक्त धीरज कुमार यांच्याशी संपर्क केला. ‘‘आम्ही बियाण्यांचे योग्य नियोजन केले आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन व इंदूर भागातील कृषी विभागाच्या उपसंचालकांनी बियाणे विक्रीवर निर्बंध टाकणारे आदेश काढले आहेत. या आदेशाविरोधात आम्ही केंद्रीय कृषी सचिवांचे लक्ष वेधले आहे,’’ असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांची गैरसोय नको
या मुद्दांबाबत मी देखील कृषी मंत्रालयाशी चर्चा करेल, असे सांगत श्री. दानवे यांनी ‘‘यंदाच्या खरिपात शेतकऱ्यांची बियाण्यांबाबत गैरसोय होऊ नये. त्यासाठी चांगले नियोजन करावे,’’ अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘‘यंदा बाजारभाव चांगले आहेत व पेरा देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाण्यांची कमतरता भासू नये,’’ असेही त्यांनी सुचविले.

खासगी बियाण्याची गरज
राज्यात खरीप हंगामात कापूस व सोयाबीन ही मुख्य पिके आहेत. यंदा सोयाबीनचा पेरा ४२ लाख हेक्टरच्या पुढे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी घरचे बियाणे वापरून खासगी कंपन्यांचे आठ लाख क्विंटलच्या पुढे खासगी कंपन्यांचे बियाणे वापरतील. हे बियाणे मुख्यत्वे मध्य प्रदेशातून येते. त्यामुळे तेथील बियाणे कंपन्यांशी महाराष्ट्रातील बियाणे विक्रेत्यांचे ३०० कोटींपेक्षा जास्त रकमेचे सौदे झाले आहेत. मात्र निर्बंध लादल्याने सर्व व्यापार ठप्प झाला आहे, अशी भूमिका या प्रतिनिधींनी श्री. दानवे यांच्याकडे मांडली. तसेच, ‘अॅग्रोवन’मधून आलेल्या वृत्तांबाबत माहिती दिली.

 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...