परभणीत एक हजार ६२० हेक्टरवर प्रात्यक्षिक प्रकल्प राबविणार

परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्यअंतर्गंत यंदा जिल्ह्यात सुधारित तंत्रज्ञानावर आधारित सलग आणि आंतर पीक पध्दतीचे प्रात्यक्षिक प्रकल्प १ हजार ६२० हेक्टरवर राबविण्यात येत आहेत.
Demonstration project will be implemented on 1,620 hectares in Parbhani
Demonstration project will be implemented on 1,620 hectares in Parbhani

परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान कडधान्यअंतर्गंत यंदा जिल्ह्यात सुधारित तंत्रज्ञानावर आधारित सलग आणि आंतर पीक पध्दतीचे प्रात्यक्षिक प्रकल्प १ हजार ६२० हेक्टरवर राबविण्यात येत आहेत. त्यासाठी १ कोटी ३५ लाख १५ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात सर्व तालुक्यांत खरीप आणि रब्बी हंगामात प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. त्यात सलग, आंतर पीक या पीकपध्दतीवरील गट प्रात्यक्षिकांचा समावेश आहे. प्रत्येक प्रात्यक्षिक प्रकल्प १० हेक्टर क्षेत्राचा आहे. सलग प्रात्यक्षिकांमध्ये खरीप हंगामात तुरीचे एकूण १३० हेक्टरवर प्रात्यक्षिक घेण्यात येत आहेत. प्रतिहेक्टरी ९ हजार रुपये याप्रमाणे एकूण ८ लाख १७ हजार रुपये निधीची तरतूद आहे. 

मुगाची एकूण ३१० हेक्टरवर प्रात्यक्षिक प्रकल्प घेण्यात आले. त्यासाठी प्रतिहेक्टरी ९ हजार रुपयांप्रमाणे एकूण १८ लाख ८३ हजार रुपये निधीची तरतूद आहे. उडदाची १० हेक्टरवर प्रकल्प आहे. त्यासाठी प्रतिहेक्टरी ९ हजार रुपयांप्रमाणे ६३ हजार ५०० रुपयाची तरतूद आहे. आतंरपीक प्रात्यक्षिक प्रकल्पात सोयाबीन अधिक तूर या पध्दतीची ७६० हेक्टरवर प्रात्यक्षिक आहे. प्रतिहेक्टरी ९ हजार रुपयांप्रमाणे एकूण ६० लाख ९५ हजार रुपयांची तरतूद आहे.

पीक पध्दतीवरील प्रात्यक्षिक प्रकल्पांत खरिपात मूग आणि रब्बीत ज्वारीची एकूण ६० हेक्टरवर प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. त्यासाठी प्रतिहेक्टरी १५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ५ लाख ५१ हजार रुपयांची  तरतूद आहे. मूगानंतर गव्हाती ४० हेक्टरवर प्रात्यक्षिके, तर त्यासाठी प्रतिहेक्टरी १५ हजार रुपयांप्रमाणे एकूण ४ लाख ७४ हजार रुपयांची तरतूद आहे. सलग पीक पध्दतीत रब्बी हंगामात हरभऱ्याचे १७० हेक्टरवर प्रात्यक्षिके, तर प्रतिहेक्टरी ९ हजार रुपयांप्रमाणे १५ लाख ३० हजार रुपयांची तरतूद आहे. खरीप ज्वारीनंतर हरभऱ्याची एकूण ११० हेक्टरवर प्रात्यक्षिके, तर त्यासाठी प्रतिहेक्टरी १५ हजार रुपयांप्रमाणे १६ लाख ५० हजार रुपये निधीची तरतुद आहे.

बाजरीनंतर हरभऱ्याची ३० हेक्टकरवर प्रात्यक्षिके, तर त्यासाठी प्रतिहेक्टरी १५ हजारा रुपयांप्रमाणे ४  लाख ५० हजार रुपयांची तरतूद आहे. 

पीक पध्दतीवरील प्रात्यक्षिक प्रकल्प २४० हेक्टरवर आहेत. त्यासाठी ३१ लाख २६ हजार रुपये निधीची तरतूद आहे, असे तंत्र अधिकारी (विस्तार) डॉ. संदीप जगताप यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com