नगरमध्ये रब्बी ज्वारीचे तीन हजार हेक्टरवर प्रात्यक्षिक

रब्बी ज्वारीचे सुधारित बियाणे पेरणी होऊन उत्पादन वाढ व्हावी यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून पौष्टिक तृणधान्य योजनेतून नगर जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर ज्वारी पीक प्रात्यक्षिक घेतले जात आहे.
Demonstration of rabbi sorghum on three thousand hectares in the town
Demonstration of rabbi sorghum on three thousand hectares in the town

नगर ः रब्बी ज्वारीचे सुधारित बियाणे पेरणी होऊन उत्पादन वाढ व्हावी यासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून पौष्टिक तृणधान्य योजनेतून नगर जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर ज्वारी पीक प्रात्यक्षिक घेतले जात आहे. त्यासाठी गावे आणि शेतकरी निवड प्रकिया तालुका कृषी अधिकारी पातळीवर सुरू आहे, असे कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी सांगितले.

प्रती हेक्टरवर सहा हजार रुपये कृषी विभाग खर्च करत असून एक कोटी ८० लाख रुपये यावर खर्च होईल. नगर जिल्ह्यात ४ लाख ७२ हजार ८९५ हेक्टर ज्वारीचे सरासरी क्षेत्र आहे. त्यात ३ हजार हेक्टरवर कृषी विभागाकडून राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानातून पौष्टिक तृणधान्य योजनेतून नगर जिल्ह्यात तीन हजार हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक राबवत आहेत. शंभर एकराचे एक प्रकल्प असेल. ज्वारीचे अधिक क्षेत्र असलेल्या भागातील गावांची व शेतकऱ्यांची त्यासाठी निवड करण्याचे काम सुरू आहे.

एका शेतकऱ्याला साधारण एक हेक्टर क्षेत्रापर्यंत प्रात्यक्षिक देण्याचे नियोजन असून एका हेक्टरवर सहा हजार रुपये खर्च केले जात आहे. बीज प्रक्रियेसाठी जैविक कीट, सूक्ष्म मूलद्रव्य, बियाणे आदी साहित्य दिले जाते. या प्रात्यक्षिकांसाठी सुधा, रेवती, सुचित्रा, मालदांडी या जातींची ही बियाणे महाबीजकडून पुरवठा केली जात आहेत.

अनुदानावर देणार १४३५ क्विंटल बियाणे ज्वारी पीक प्रात्यक्षिकांच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना सुधारित ज्वारीचे बियाणे मिळावे यासाठी कृषी विभागाकडून नगर जिल्ह्यासाठी १४३५ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले आहे. महाबीजकडून हे बियाणे तालुका पातळीवर वितरित झाले आहे. ज्या शेतकऱ्यांना हे बियाणे हवे आहे त्यांनी तालुका कृषी कार्यालयातून परमीट घेऊन बियाणे घ्यावे. या बियाणे खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती किलोला पंचवीस रुपये अनुदान आहे, असे कृषी विभागातून सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com