Agriculture News in Marathi Denial of stock limit; Soybean market support | Page 2 ||| Agrowon

स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला आधार 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार नसल्याचे सांगितल्यानंतर बाजारात याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील बाजार समित्यांत बुधवारच्या तुलनेत शनिवारपर्यंत दरात सुधारणा झाली होती.

पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार नसल्याचे सांगितल्यानंतर बाजारात याची सकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील बाजार समित्यांत बुधवारच्या तुलनेत शनिवारपर्यंत दरात सुधारणा झाली होती. सरकारच्या या निर्णयाने व्यापारी, स्टॉकिस्ट, आणि प्रक्रियादारांसह शेतकऱ्यांनाही लाभ होईल, असे जाणकारांनी सांगितले. तर बाजार समित्यांत सोयाबीनच्या दरात ५० ते २५० रुपयांची वाढ झाल्याचे स्प्ष्ट झाले आहे. 

देशांतर्गत वाढत्या खाद्यतेल दारमुळे केंद्र सरकार जेरीस आले होते. त्यामुळे केंद्राने राज्य सरकारांनी खाद्यतेल आणि तेलबियांवर स्टॉक लिमिट लागू करण्याची सूचना ८ ऑक्टोबरला दिली होती. एरवी केंद्र सरकारच स्टॉक लिमिट ठरवून राज्यांना अंमलबजावणी करण्यास सांगते. मात्र यावेळी राज्यांनाच मर्यादा ठरविण्याचे अधिकार दिले होते. मात्र महाराष्ट्र सरकारने स्टॉक लिमिट लावणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना मुक्तपणे व्यापार करता येईल, याचा लाभ सोयाबीन दरवाढीसाठी होईल. व्यापारी, प्रक्रिया प्लांट्स, स्टॉकिस्ट आता कोणत्याही भीतीशिवाय खरेदीत उतरतील. परिणामी सोयाबीन दरवाढ होण्यास मदत होईल, असे जाणकारांनी सांगितले आहे. 

सरकारने बुधवारी निर्णय जाहीर केल्यानंतर सोयाबीन दरात ५० ते २५० रुपयांपर्यंत सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. प्रक्रिया प्लांट्स त्यांच्या गरजेप्रमाणे खरेदी करतात. मात्र मोठे व्यापारी, स्टॉकिस्ट, स्पेक्युलेटर्स आणि बहुराष्ट्रीय कंपन्या आतापर्यंत खरेदीपासून दूर होत्या. आता मात्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याने हे स्टेकहोल्डर्स बाजारात उतरण्याची शक्यता आहे. सध्या सोयाबीनमध्ये तेजी असल्याने स्टॉकिस्ट खरेदीत कमीच उतरत आहेत मात्र दराला आधार मिळतो. 

अशी झाली दरात वाढ 
राज्यातील महत्वाच्या बाजार समित्यांमधील दराचा आढावा घेतल्यास दरवाढ झाल्याचे स्पष्ट होते. बुधवारी कारंजा बाजार समितीत सोयाबीनला सर्वसाधारण ६ हजार १०० रुपये दर होता, तो शनिवारी ६ हजार २०० रुपयांवर पोचला. लातूर बाजार समितीत बुधवारी सरासरी दर ६ हजार ७०० रुपये दर होता, तो शुक्रवारी ६ हजार ९०० रुपयांवर पोचला. तर वाशीम बाजारात सोयाबीनचा दर सहा हजारांवरून ६ हजार ३०० रुपयांवर स्थिरावला. मानवत बाजार समितीतही दरात १०० रुपयांची सुधारणा होत ६ हजार रुपयांवरून ६ हजार २०० रुपयांवर पोचला. 

प्रतिक्रिया 
सोयाबीनवर साठा मर्यादा न लावण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेशनेही अशी घोषणा केल्यास बाजाराला मोठा आधार मिळेल. सध्या सोयाबीनचा बाजार वाढला आहे. स्टाक लिमिटच्या भीतीने मोठे स्टॉकिस्ट, बहुराष्ट्रीय कंपन्यांनी साठा केलाच नव्हता. आता सरकारने साठा मर्यादा लावणार नसल्याचे स्पष्ट केल्याने दरवाढीला मदत होईल. शेतकरी, व्यापारी, प्रक्रियादार आणि स्टॉकिस्ट यांनाही याचा लाभ मिळणार आहे 
- दिनेश सोमाणी, शेतीमाल बाजार विश्लेषक  


इतर बातम्या
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...
नगरच्या सहकारावर नागवडे, मुरकुटेंची पकडउस्मानाबाद : नगर ः जिल्ह्यात श्रीगोंदा...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणाआठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती तसेच...