Agriculture News in Marathi Denial of stock limit; Soybean market support | Page 4 ||| Agrowon

राज्यात पावसाला पोषक हवामान 

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने गारठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. यातच गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २८) ढगाळ हवामानासह कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

पुणे : राज्याच्या किमान तापमानात आणखी घट झाल्याने गारठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. यातच गेल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. २८) ढगाळ हवामानासह कोरड्या हवामानाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

श्रीलंका आणि लगतच्या कोमोरीन समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. यामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ जोरदार वारे वाहत आहेत. ही चक्राकार वाऱ्यांची स्थिती आज (ता. २८) अरबी समुद्राकडे सरकणार आहे. दक्षिण अंदमान समुद्रात सोमवारपर्यंत (ता. २९) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. पश्चिम आणि वायव्य दिशेकडे येताना या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.   

उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानाचा पारा घसरण्यास सुरुवात झाली आहे. कोकण वगळता उर्वरीत राज्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान १८ अंशांच्या खाली आले आहे. शनिवारी (ता. २७) नागपूर येथे नीचांकी १३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सांताक्रूझ येथे उच्चांकी ३४.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. 

शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)
पुणे ३२.२ (१६.१), नगर ३२.३ (१६.८), जळगाव ३२.७ (१५.३), कोल्हापूर ३१.२ (१९.१), महाबळेश्वर २६.१ (१५.४), मालेगाव ३१.० (-), नाशिक ३२.४ (१५.४), निफाड २९.० (१५.१), सांगली ३२.२ (१८.२), सातारा ३०.४(१८.९), सोलापूर ३३.२ (१७.२), सांताक्रूझ ३४.७(२२.८), अलिबाग ३४.२ (-), डहाणू ३२.५ (२१.६), रत्नागिरी - (२१.७), औरंगाबाद ३२.० (१५.०), नांदेड ३१.८ (१८.०), परभणी ३१.५ (१७.१), अकोला ३३.२ (१७.८), अमरावती ३१.८ (१५.१), ब्रह्मपुरी ३३.५ (१६.५), बुलडाणा ३०.० (१५.८), चंद्रपूर ३०.६ (१७.०), गडचिरोली ३०.४(१७.८), गोंदिया ३०.४ (१५.०), नागपूर ३१.८ (१३.६), वर्धा ३१.५(१५.०), वाशीम ३२.५ (१५.०), यवतमाळ ३२.० (१५.०).


इतर बातम्या
तापमानात वाढ, गारठा होतोय कमी पुणे : राज्यात अशंतः ढगाळ हवामान असले तरी,...
पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या ...मुंबई : राज्यातील जिल्हा परिषदा आणि सरकारच्या...
‘सहकार’ला पुन्हा हवे  लेखापरीक्षणाचे...पुणे ः राज्याच्या सहकार चळवळीतील गैरप्रकार...
बदलत्या वातावरणाचे बेदाणा निर्मितीवर...सांगली ः जिल्ह्यात बेदाणा निर्मितीला गती आली आहे...
तुरीच्या दरात काहीशी सुधारणा पुणे ः आठवडाभरात तुरीची आवक काहीशी मंदावली होती....
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत  डॉ. एन. डी...  कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत,...
विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे ...पुणेः कृषी विद्यापीठांमध्ये रोजंदारीवर लागलेल्या...
पपईला मिळेना किलोला ४.७५ रुपयांचाही...जळगाव ः  खानदेशात पपई दर शेतकऱ्यांना...
ऊस तोडणीस विलंब; शेतकऱ्यांत चिंतासातारा ः अवेळी झालेल्या पाऊस, अनेक कारखान्यांची...
पुणे जिल्हा परिषदेवर प्रशासक?पुणे ः जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील विविध पंचायत...
गाव कोरोनामुक्त ठेवून ५० लाख जिंकापुणे ः कोरोनाच्या प्रादुर्भावापासून गावमुक्तीसाठी...
सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीची...सोलापूर ः सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
वीज प्रश्नांवर मार्ग काढू : भुजबळनाशिक : ‘‘शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी...
तूर डाळ शंभरी गाठणार नागपूर ः खरीप पिकांना अवेळी आलेल्या पावसाचा फटका...
पाच जिल्ह्यांत १४ लाख हेक्‍टरवर रब्बीची...लातूर : विभागातील लातूर, उस्मानाबाद, परभणी,...
जळगाव, अमळनेर, चोपडा बाजारात मक्याचे दर...जळगाव ः  जिल्ह्यातील जळगाव, चोपडा व...
बीटी वांगी लागवडीसाठी १७...पुणे ः जनुकीय परावर्तित (जीएम) बियाणे बंदी...
मनमाडमध्ये वाढत्या थंडीमुळे दूध...मनमाड, ता. नांदगाव : गेल्या काही दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यात पीककर्जाची मर्यादा...सोलापूर ः शेतीचे अपेक्षित उत्पन्न आणि हवामानाचा...
जळगावात ‘वाळू माफियाराज’जळगाव ः जिल्ह्यात विशेषतः जळगाव तालुक्यातील सर्वच...