मराठवाड्यात ढगांची दाटी; भुरभुर

औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा आकाशात ढगांची गर्दी झाली आहे. काही ठिकाणी भुरभुर, तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. कीड-रोगांना पोषक अशा या वातावरणामुळे तूर, द्राक्ष, हरभरा, भाजीपालावर्गीय पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये धास्ती आहे.
Dense clouds in Marathwada; Sprinkle
Dense clouds in Marathwada; Sprinkle

औरंगाबाद : मराठवाड्यातील बहुतांश भागात पुन्हा एकदा आकाशात ढगांची गर्दी झाली आहे. काही ठिकाणी भुरभुर, तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. कीड-रोगांना पोषक अशा या वातावरणामुळे तूर, द्राक्ष, हरभरा, भाजीपालावर्गीय पिकांबाबत शेतकऱ्यांमध्ये धास्ती आहे. 

मराठवाड्यातील बहुतांश भागात बुधवारी (ता.१) ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झाले नाही. औरंगाबाद तालुक्‍यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण राहिले. अधून मधून पावसाचे तुरळक थेंब पडत होते. गवळीशिवरा, गंगापूर, कायगाव, नागद, आमठाणा, जायकवाडी, ढोरकीन, शिवूर, आळंद आदी ठिकाणी पावसाची थोडी भुरभुर झाली. तुर्काबाद खराडी परिसरातील घोडेगाव शहापूर (ता. गंगापूर) दुपारी दीडच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. या पावसाने चांगलीच तारांबळ उडविली. जालना, उस्मानाबाद, बीड, लातूर जिल्ह्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण पहायला मिळाले.

लांबलेल्या पावसाळ्याने आधीच शेतकऱ्यांची रब्बीची पेरणी लांबणीवर पडली आहे. तुरीवरही संकटाचे ढग गडद होत आहेत. यापूर्वी तुरीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी आवश्‍यक फवारणी केली. त्यामुळे त्यावेळचे संकट टळले. तूर आता कुठे फुलोरा, पापडी व कुठे शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. आता तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्‍त केली आहे. तुरीसोबतच रब्बीत आधीच रखडत पेरणी होतअसलेल्या हरभऱ्यावर घाटेअळी व उंट अळीचे संकट आहे. 

कांदा व टोमॅटोवर करपाचे संकट येण्याची भीतीही वाढली आहे. अर्थात या सर्व संकटाचे परिणाम दिसण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागेल. त्यादरम्यान शेतकऱ्यांनी शिफारशित कीटकनाशकांचा वापर व फवारण्यांची दक्षता घेतल्यास संकटाची तीव्रता कमी करता येऊ शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com