Agriculture news in Marathi Deola taluka hits onion for climate change | Agrowon

देवळा तालुक्यात हवामान बदलाचा कांद्याला फटका 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 9 एप्रिल 2020

नाशिक : हवामान बदलामुळे ढगाळ राहिलेले वातावरण, मार्चअखेर झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे उन्हाळ कांद्याच्या लागवडी बाधित झाल्या आहेत. देवळा तालुक्यातील अनेक भागात कांद्याची पात करपून गेल्यामुळे कांद्याची वाढ खुंटल्याने एकरी उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे खरिपानंतर पुन्हा एकदा कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहे. 

नाशिक : हवामान बदलामुळे ढगाळ राहिलेले वातावरण, मार्चअखेर झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे उन्हाळ कांद्याच्या लागवडी बाधित झाल्या आहेत. देवळा तालुक्यातील अनेक भागात कांद्याची पात करपून गेल्यामुळे कांद्याची वाढ खुंटल्याने एकरी उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे खरिपानंतर पुन्हा एकदा कांदा उत्पादक अडचणीत सापडले आहे. 

मार्चअखेर झालेल्या पूर्वमोसमी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर कांद्याचे पीक बाधित झाले आहे. यापूर्वी खरीप कांद्यामध्ये कंदसड झाल्याने उत्पादकता कमालीची घटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर उन्हाळ कांद्याची रोपे अतिवृष्टीमुळे खराब झाल्याने शेतकऱ्यांनी दुबार रोपे त्यात करून तर रोपे खरेदी करून लागवडी केल्या. त्यामुळे कांदा रोपे, लागवड खर्च यावर अतिरिक्त खर्च झाला आहे. त्यात आता हवामान बदलांमुळे रोगाचा प्रादुर्भाव कांद्यावर झाला आहे. 

तालुक्यातील लोहोणेर, ठेंगोडा, सावकी, विठेवाडी, भऊर, खामखेडा परिसरात हा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्या लागवडी फेब्रुवारीच्या मध्यावधीत झाल्या त्यामध्ये हा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येत आहे. कांदा पोसण्याच्या दरम्यान पात करपून गेली आहे.त्यामुळे कांद्याची अपेक्षित वाढ होणार नसल्याचे एकरी उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

एकीकडे ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शेतकरी आर्थिक कोंडीला सामोरा जात आहे. जी पिके हातात असून विक्रीयोग्य असताना लॉकडाऊनमुळे विक्रीत अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे दराचा फटका सहन करावा लागत आहे.

ही आहे स्थिती :

  • पिकाचा कालावधी पूर्ण न होता कांदापात करपली
  • कांद्याची वाढ न झाल्याने आकार व वजन आलेले नाही
  • एकरी उत्पादनात घट होण्याची शक्यता

उन्हाळ कांद्याच्या लागवडी अनेक अडचणी पार करून झाल्या. त्यात रोपांची उपलब्धता, जास्त मजुरी देऊन लागवडी केल्या. मात्र, हवामान बदलांमुळे कांद्याची पात करपून जाऊन कांद्याची वाढ झालेली नाही. आता पूर्ण पीक कालावधी न होऊनही कांदे काढून घ्यावे लागतील. मात्र, उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार आहे.
- अमर जाधव, कांदा उत्पादक, भऊर, ता. देवळा


इतर ताज्या घडामोडी
चंद्रपूर जिल्ह्यात पंधरा हजारांवर ...चंद्रपूर ः शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची हमी राज्य...
शेतकऱ्यांना प्रतीक्षा फळपीक विमा...नगरः मृगबहारासाठी पंतप्रधान विमा योजनेअंतर्गत...
पुणे जिल्ह्यातील गावांतील आठवडे बाजार...पुणे: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अडीच...
माती परीक्षणानुसार करा खतांचे नियोजनमाती परीक्षण हा पीक उत्पादनाचा आत्मा आहे. आगामी...
सुधारित तंत्राने करा शेवगा लागवडलागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील अंतर २.५ ते ३...
भात पुर्नलागवडीची चारसूत्री पद्धतीसूत्र १  भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व...
हिंगोलीत हळद ४८०० ते ५२०० रुपये...हिंगोली : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
संतुलित खत व्यवस्थापनावर द्या भरमाती परीक्षणानुसार जमिनीमध्ये उपलब्ध...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
सुधारित तंत्राने शेवगा लागवडशेवग्याची लागवड करताना दोन झाडांतील व ओळीतील...
वेलीचा वाढता जोम नियंत्रणात ठेवण्याकडे...द्राक्षबागेत गेल्या दोन दिवसापासून वातावरण...
कोरडवाहू शेतीसाठी आंतरपीक पद्धती...महाराष्ट्र राज्यात कोरडवाहू शेतीचे जवळपास ८५...
फळबागांमध्ये घ्या फुलांचे आंतरपीकफळपिकांच्या लागवडीमध्ये आंतरपीक घेणे हा एक चांगला...
मांडा ग्रामपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रकआपल्या गावाचा ग्रामविकास आराखडा आपण सर्वांनी...
नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
कापूस सल्ला कोरडवाहू पिकाकरिता तीन वर्षातून एकदा खोल...