पीकविम्यासाठी कृषी विभागाचे पंचनामे ग्राह्य धरावेत ः गायकवाड

नगर ः अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने केलेल्या पाहणीच्या व पंचनाम्याच्या आधारे नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी पारनेर बाजार समितीचे सभापती व जिल्हा बॅंकेचे संचालक प्रशांत सबाजीराव गायकवाड यांनी माजी केद्रीय कृषिमंत्री शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
Department of Agriculture for crop insurance Punchnames should be accepted: Gaikwad

भरपाई मिळण्यासाठी आता पंचनामे होणार नाहीत. त्याऐवजी शेतकऱ्यांनी मोबाईलवर माहिती देणे बंधनकारक केले आहे. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे मोबाईल व अन्य बाबी नाहीत, असे निवेदनात नमूद आहे.

गायकवाड यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने रब्बीतील तसेच उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली घास अवकाळी पावसाने हिरावला आहे.

 ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा भरला आहे त्यांना पिकविम्याची भरपाई मिळावी यासाठी आता पूर्वीसारखे पंचनामे ग्राह्य धरले जाणार नाहीत. त्याऐवजी शेतकऱ्यांनी मोबाईल अथवा ई-मेलद्वारे कंपनीला ७२ तासांत माहिती कळवावी असा नियम केला आहे. मात्र अनेक शेतकऱ्यांकडे अशी माहिती देण्यासाठीचे मोबाईल नाहीत.

अनेक शेतकरी ई-मेल वापरत नाहीत. त्यामुळे असे शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या नियमात बदल करून कृषी विभागाचे पंचनामे ग्राह्य धरुन शेतकऱ्यांना पीकविमा द्यावा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com