कृषी विभाग यंदापासून देणार ९९ पुरस्कार ः कृषिमंत्री दादा भुसे

शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढविण्यात आली असून, आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कार दरवर्षी दिले जातील : कृषिमंत्री दादा भुसे
Department of Agriculture to give 99 awards from this year: Agriculture Minister Bhuse
Department of Agriculture to give 99 awards from this year: Agriculture Minister Bhuse

मुंबई : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढविण्यात आली असून, आता ६३ ऐवजी ९९ पुरस्कार दरवर्षी दिले जातील. या वर्षापासून ‘युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ या नव्या पुरस्कारांचा समावेश करण्यात आला असून, काही पुरस्कारांचे निकष बदलण्यात आल्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

राज्य शासनामार्फत सन १९६७ पासून कृषिक्षेत्रातील विविध पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार, सेंद्रिय शेती पुरस्कार, उद्यानपंडित पुरस्कार व शेतीनिष्ठ या पुरस्कारांचा समावेश आहे.

कृषिमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांसाठीचे पात्रतेचे निकष बदलण्याबरोबरच त्यांची संख्या वाढविण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये तरुण शेतकऱ्यांना वाव देणेसाठी नव्याने ‘युवा शेतकरी पुरस्कार’ व उत्तम काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यासाठी ‘उत्कृष्ट कृषी संशोधक’ पुरस्काराचा समावेश केला आहे. पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल करून निवड आणि शिफारशीबाबतच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणि एकसूत्रीपणा येण्यासाठी बदल करण्यात आल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

यापूर्वी कृषी विभागामार्फत एकूण ६३ पुरस्कार देण्यात येत होते. त्यात काही पुरस्कारांची संख्या वाढवून नव्याने ३६ पुरस्कारांची वाढ करण्यात आली असून, आता ९९ पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागांतून व सर्व जिल्ह्यांतून शेतकरी निवडले जातील याची खबरदारी घेण्यात आली आहे.

देण्यात येणारे पुरस्कार पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- १, जिजामाता कृषिभूषण पुरस्कार- ८, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारांची संख्या ५ वरून ८ करण्यात आली आहे. सेंद्रिय शेती पुरस्कार ८, उद्यान पंडित पुरस्कार ८, शेती मित्र पुरस्कार ३ वरून ८ करण्यात आले असून, शेतीनिष्ठ पुरस्कारांची संख्या २५ वरून ४० करण्यात आली आहे. सेवारत्न पुरस्कार २ वरून ९ करण्यात आले, तर नव्याने समावेश करण्यात आलेला युवा शेतकरी पुरस्कार ८ जणांना दिला जाईल. उत्कृष्ट कृषी संशोधक पुरस्काराची संख्या १ आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com