agriculture news in marathi In the Department of Agriculture, Solapur Corona's lethal infiltration | Page 3 ||| Agrowon

सोलापूरच्या कृषी विभागात कोरोनाचा शिरकाव

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 एप्रिल 2021

सोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर वाढतो आहे. या संसर्गातून जिल्ह्याचा कृषी विभागही सुटू शकलेला नाही. कृषी विभागातील सहा कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी झुंज देताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

सोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर वाढतो आहे. या संसर्गातून जिल्ह्याचा कृषी विभागही सुटू शकलेला नाही. कृषी विभागातील सहा कर्मचाऱ्यांचा कोरोनाशी झुंज देताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांसह अन्य दहा जणही सध्या कोरोना बाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.   

गेल्या पंधरवड्यापासून जिल्ह्याची परिस्थिती अत्यंत विदारक झाली आहे. जवळपास सर्व रुग्णालये आधीच भरली आहेत. त्यामुळे नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांची हेळसांड होते आहे. ऑक्सिजन, रेमडेसिवरची उपलब्धता यासारख्या प्रश्नांची त्यात आणखी भर पडली आहे. जिल्ह्यात रोज १२०० ते १५०० हून अधिक जण कोरोनामुळे बाधित आढळत आहेत. याच कोरोनाच्या लढ्यात कृषी विभागातील अधिकारी-कर्मचारीही सुटू शकलेले नाहीत. त्याची मोठी झळ कृषी विभागाला बसली आहे. 

गेल्या आठवड्यात कृषी विभागातील सहा अधिकारी-कर्मचाऱ्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. यामध्ये कृषी कार्यालयातील तंत्र अधिकारी शिवाजीराव चौगुले, कृषी पर्यवेक्षक अशोक कुंभार, आंधळगाव मंडळातील कृषी सहायक प्रशांत कोळी, मंडल कृषी अधिकारी चंद्रकांत गावढे, कृषी सहायक अशोक मित्रगोत्री आणि कृषी पर्यवेक्षक अरुण मुचंडे यांचा त्यात समावेश आहे. त्याशिवाय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जयवंत कवडे यांच्यासह कृषी विभागातील अन्य आठ ते दहा कर्मचारीही कोरोना बाधित निघाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

कृषी विभागाचे नुकसान

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच कृषी विभागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने त्याची मोठी झळ कृषी विभागाला बसली आहे. तंत्र अधिकारी शिवाजीराव चौगुले, कृषी पर्यवेक्षक अशोक कुंभार आणि अशोक मित्रगोत्री हे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत होते. विशेष म्हणजे महत्त्वाचे विभाग सांभाळणारे आणि कार्यतत्पर असे हे अधिकारी-कर्मचारी होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांसह कृषी विभागाचेही मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
शिरोळमधील ३७ हजार कुटुंबांना...जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : संभाव्य पुराच्या...
सौरउर्जेद्वारे २५ हजार मेगावॅट ...औरंगाबाद : राज्यात यापुढे नवीन औष्णिक प्रकल्प...
पीककर्ज देणार नसाल तर किडनी विक्रीची...अकोला : गेला हंगाम सुरळीत न गेल्याने अनेक...
भरड धान्याची हमीभावाने खरेदी सुरू ः...नाशिक : ‘‘पणन हंगाम २०२०-२१ रब्बीसाठी गहू व...
माजलगाव तालुक्यात मशागत आटोपली;...माजलगाव, जि. बीड : मागील दोन वर्षांपासून परतीच्या...
शेतकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर राहा ः...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या...
जालना जिल्ह्यात मक्याचे पस्तीस हजार...जालना : ‘‘जिल्ह्यात पाच केंद्रांत मक्याची किमान...
खानदेशात वादळामुळे झालेल्या २५ टक्के...जळगाव : खानदेशात पूर्वमोसमी पाऊस व वादळाने मे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची...परभणी / हिंगोली : कोरोनामुक्त गाव या स्पर्धेच्या...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीची १७ केंद्रांत...जळगाव : जिल्ह्यात १७ केंद्रांमध्ये मका, ज्वारी व...
शेती तंत्रासाठी ई-पॉकेट बुक उपयोगीसोलापूर ः कृषी क्षेत्रात तरुणांना आधुनिक शेती...
कृषी कायद्यात करणार सुधारणा ः...मुंबई ः केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे...
इंधन दरवाढप्रश्‍नी काँग्रेसचे राज्यभर...नागपूर ः पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने होणाऱ्या...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
मॉन्सूनची कर्नाटकपर्यंत मजलपुणे : नैॡत्य मोसमी वारे (मॉन्सून) केरळात दाखल...
बियाणेनिर्मितीसाठी नवी कार्यपद्धती लागूपुणे ः राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी...
केळी निर्यातीसाठी आता ‘बनाना नेट’पुणे ः द्राक्ष, डाळिंब, आंबा, भाजीपाला,...
दूधदरप्रश्‍नी लढा उभारणार ः अजित नवलेनगर ः कोरोनामुळे लॉकडाउन झाल्याने दुधाची मागणी...
कृषी प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती...मुंबई : राज्यामध्ये कृषी प्रक्रिया व मालाची...
विमा कंपन्यांशी मंत्र्यांचे साटेलोटे ः...नागपूर : पीकविमा कंपन्यांच्या विरोधात यापूर्वी...