Agriculture news in Marathi Department of Agriculture will provide information on legumes | Agrowon

चंद्रपूर कृषी विभाग देणार रानभाज्यांची माहिती

संदीप रायपूरे
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

रानात राहणारे आदिवासी बांधव व जुनेजाणते आजही या भाज्या आवर्जून खातात. पण अनेकांना या वनसंपदेची माहितीच नाही. या उज्वल वनठेव्याची माहिती व्हावी यासाठी आता कृषी विभाग सरसावला आहे.

गोंडपिपरी, जि. चंद्रपूर ः अळू, काटवल, सूरण, टरोटा, टेना, बांबूचे वायदे, कुंदरभाजी, कुड्याची फुल आणि या सारख्या अनेक रानभाज्या खाण्यासाठी तसेच आरोग्यासाठी अतिउत्तम  आहेत. रानात राहणारे आदिवासी बांधव व जुनेजाणते आजही या भाज्या आवर्जून खातात. पण अनेकांना या वनसंपदेची माहितीच नाही. या उज्वल वनठेव्याची माहिती व्हावी यासाठी आता कृषी विभाग सरसावला आहे. येत्या नऊ ऑगष्ट रोजी जिल्ह्यातील संपूर्ण तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत या रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

चंद्रपूर जिल्हा वनवैभवाने संपन्न आहे. येथील जंगलात मोठ्या प्रमाणावर दुर्मीळ वन्यजीव आढळतात. त्याचप्रमाणे मानवी जीवनास उपयोगी रानभाज्यांचा खजिना येथे आहे. मानवी आरोग्यास अतिशय लाभदायी ठरणाऱ्या विविध रानभाज्या जंगलालगत असणारे नागरिक चवीने खातात. पूर्वी आदिवासी बांधव व जुने जाणते नागरिकांना या भाज्यांची खडानखडा माहिती होती.पण आता मात्र या रानभाज्या, रानफुले, उपलब्ध असून देखील अनेकांना माहीत नाही. त्यामुळे  हा महत्त्वपूर्ण रानठेवा पूर्णतः दुर्लक्षित आहे. जंगली काटवल, कुड्याची फुले, कुंदरभाजी, टेना, तरोटा व अशा अनेक रानभाज्या रानफुलांची चव उत्तम असते. याचसोबत त्या आरोग्यासाठी अतिउत्तम आहेत.

कृषी विभागाच्या वतीने येत्या ९ ऑगष्ट रोजी जिल्ह्यातील संपूर्ण तालुका कृषी विभागाच्या कार्यालयात रानभाज्यांचे व रानफुलांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. यासाठी विभागाची यंत्रणा कामाला लागली आहे. अनुभवी, जाणते व ज्येष्ठ नागरिकांकडून रानभाज्यांची, रानफुलांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे. स्वतः तालुका कृषी अधिकारी या उपक्रमाकरिता प्रकर्षाने परिश्रम घेत आहेत.

या उपयोगी रानठेव्याची माहिती प्रदर्शित झाल्यास नवीन पिढीला याची माहिती मिळणे सुलभ होणार असून त्यांच्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे. रानभाजी, रानफुले हे खाण्यास उपयुक्त असून आयुर्वेदिक औषधी म्हणून त्याचा उपयोग होत असल्याने त्याचे महत्त्व समजून घेणे काळाची गरज ठरली आहे.

येत्या ९ ऑगष्ट रोजी तालुका कृषी विभागाच्या वतीने गोंडपिपरीतील कार्यालयात रानभाजी महोत्सव होऊ घातला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून रानठेव्याची माहिती समोर येईल. त्याचा निश्चित फायदा होईल.
- मंगेश पवार, तालुका कृषी अधिकारी, गोंडपिपरी


इतर ताज्या घडामोडी
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
गाय एका आठवड्यात दोनदा व्यायली नाशिक ः येथील डॉ. इरफान खान हे व्यवसायाने डॉक्टर...
हवामान बदलाचे सेंद्रिय कर्बावरील परिणामजागतिक हवामान बदल आणि जागतिक तापमान वाढ हे शब्द...
पुण्यात भाजीपाल्याच्या आवकेत घटपुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...