Agriculture news in Marathi Department of Agriculture's campaign for distribution of gram seeds | Agrowon

हरभरा बियाणे वितरणासाठी कृषी विभागाची मोहीम

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 ऑक्टोबर 2021

राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढविण्याकरिता ३८ कोटी रुपयांचे अनुदानित बियाणे वाटण्यासाठी कृषी विभागाने मोहिमेला सुरुवात केली आहे. 

पुणे ः राज्यातील रब्बी हंगामात हरभऱ्याचे क्षेत्र वाढविण्याकरिता ३८ कोटी रुपयांचे अनुदानित बियाणे वाटण्यासाठी कृषी विभागाने मोहिमेला सुरुवात केली आहे. 

रब्बी हंगामातील बियाणे वाटपाच्या नियोजनाचा आढावा कृषिमंत्री दादा भुसे यांनी घेतला. एका शेतकऱ्याला पाच एकर मर्यादेपर्यंत हरभरा बियाणे मिळणार आहे. हरभरा बियाण्यावर कृषी विभागाकडून यंदा प्रतिक्विंटल २५०० रुपये अनुदान दिले जात आहे.  

‘‘कृषी विभागाकडून अनुदानावर वाटल्या जाणाऱ्या गुणवत्तापूर्ण हरभरा बियाण्याचा शेतकऱ्यांची लाभ घ्यावा. यामुळे उत्पादन व उत्पादकता वाढीसाठी मदत होईल,’’ असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. 

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातून प्रमाणित हरभरा बियाणे वितरणासाठी सोमवारपासून राज्यभर सुरू झालेली ही मोहीम २४ ऑक्टोबरपर्यंत चालू राहील. यंदा भरपूर पावसामुळे जमिनीत उत्तम ओलावा असल्याने हरभरा पिकासाठी सर्वांत चांगली स्थिती तयार झालेली आहे. त्यामुळे यंदा ३० लाख हेक्टरच्या पुढे हरभरा पेरला जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २६ लाख हेक्टरवर हरभऱ्या पेरा केला होता. 

रब्बीत आता ५० टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र हरभऱ्याकडून व्यापले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रमाणित बियाणे मिळवून देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आहे. यात पीडीकेव्ही कांचन, फुले विक्रांत, फुले विक्रम, आरव्हीजी २०२, बीडीएनजीके ७९८ या वाणांचा समावेश आहे. किमान एक लाख ९७ हजार क्विंटल बियाण्यांचे वितरण केले जाईल. शेतकऱ्यांना यापैकी २३ हजार क्विंटल बियाणे पूर्णतः मोफत दिले जात आहे. ते पीक प्रात्यक्षिकांसाठी वापरले जाईल. उर्वरित बियाण्यांवर मात्र प्रतिक्विंटल अडीच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
सोयापेंड आयातीचा प्रस्ताव नाहीपुणे ः पोल्ट्री उद्योगाने सोयापेंड आयातीसाठी...
सरसेनाध्यक्ष हेलिकॉप्टर अपघातामध्ये...नवी दिल्ली ः तमिळनाडूमध्ये लष्करी हेलिकाॅप्टरला...
सोयाबीन हेक्टरी पिकले बारा क्विंटल ३५...लातूर : पीक कापणी प्रयोगाअंती लातूर जिल्ह्यात...
‘पशुसंवर्धन’च्या लाभासाठी मराठवाड्यातून...औरंगाबाद : पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध लाभाच्या...
‘नाफेड’साठी खरेदी केलेला कांदा चाळीतच...नाशिक : केंद्राच्या भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत ‘...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होत असतानाच,...
देशात नवा खत कायदा आणण्याच्या हालचालीपुणे ः देशासाठी स्वतंत्र खत कायदा तयार करण्याच्या...
शेवग्याला दराची झळाळीकोल्हापूर : राज्यात नुकत्याच झालेल्या...
बायो-सीएनजी गॅसवर ट्रॅक्टर चालविण्याचा...माळेगाव, जि. पुणे ः शेती आणि शेतीपूरक व्यवसाय...
बायोसिरप तंत्रामुळे इथेनॉल उद्योगाचे...पुणे ः उसाच्या रसापासून इथेनॉल तयार करता येते;...
उसातील सोयाबीनचे एकरी १८ क्विंटल उत्पादनपुणे जिल्ह्यात कोऱ्हाळे बु. थोपटेवाडी (ता....
कांदा बीजोत्पादनात प्रावीण्य मिळवलेले...अंतापूर (ता.सटाणा. जि. नाशिक) येथील नानाजी...
राज्यामध्ये थंडीत वाढ होण्याची शक्यतापुणे : राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागली आहे...
मराठवाड्यात रब्‍बीत कपाशीची लागवडऔरंगाबाद : मराठवाडा म्हणजे कपाशीचा पट्टा. या...
मर रोगामुळे तुरीचे उभे पीक वाळू लागलेनांदेड : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून...
बळिराजासाठी पोलिस आले धावूनसिरोंचा, गडचिरोली : शेतात पांढरे सोने, अर्थात...
आंदोलनातील शहिदांना आर्थिक भरपाई द्यावी...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी...
आरक्षण नाही, तर मतदान नाही; ओबीसींचा...भंडारा : २७ टक्के ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकारने...
सोयाबीन बाजारात हेलकावेपुणे ः पंधरा दिवसांपासून सोयाबीन बाजारात चढ-उतार...
नांदेड जिल्ह्यात फळपीक विमा मंजुरीची...नांदेड : मागील वर्षी मृग तसेच आंबिया बहरासाठी...