agriculture news in marathi department allocations to ministers in state | Agrowon

खातेवाटप जाहीर : सुभाष देसाईंकडे कृषी, थोरातांकडे महसूल

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचे तात्पुरते खातेवाटप जाहीर झाले आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहमंत्रिपदाची, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रिपद तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांकडे महसूल मंत्रिपद सोपविण्यात आले आहे. सद्यस्थितीला कृषी खाते शिवसेनेच्या सुभाष देसाई यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळाचे तात्पुरते खातेवाटप जाहीर झाले आहे. शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहमंत्रिपदाची, राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्रिपद तर काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांकडे महसूल मंत्रिपद सोपविण्यात आले आहे. सद्यस्थितीला कृषी खाते शिवसेनेच्या सुभाष देसाई यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही पक्षांच्या एकंदर सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. मात्र खातेवाटप झाले नव्हते. तब्बल पंधरा दिवसानंतर गुरुवारी (ता. १२) हे खातेवाटप जाहीर करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मान्यता दिली आहे.

ज्या मंत्र्यांकडे कोणतेही नेमून दिलेले खाते किंवा विशिष्ट विभाग नसेल, त्या सर्व विभागांची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहणार आहे. येत्या 16 ते 21 डिसेंबर या कालावधीत नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसल्याची शक्यता आहे.

त्यामुळे अधिवेशनात महाविकास आघाडीचे केवळ सहाच मंत्री राहतील.
हिवाळी अधिवेशनात विविध चर्चांना सामोरे जाण्यासाठी खातेवाटप आवश्यक होते. त्याच हेतूने सध्याची प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचे बोलले जाते. अधिवेशनानंतर डिसेंबरअखेरीस मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतरच खातेवाटपाचे वास्तव चित्र पुढे येणार आहे. महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणते खाते आले आहे आणि पक्षनिहाय किती खाती मिळाली आहेत हे समजू शकणार आहे.

सध्याचे खातेवाटप असे आहे.

  • एकनाथ संभाजी शिंदे : यांच्याकडे गृह, नगर विकास, वने, पर्यावरण, पाणीपुरवठा व स्वच्छता, मृद व जलसंधारण, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याण ही खाती राहणार आहेत.
  • छगन चंद्रकांत भुजबळ : यांच्याकडे ग्रामविकास, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, अन्न व औषध प्रशासन ही खाती सोपविण्यात आली आहेत.
  • विजय ऊर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात : यांच्याकडे महसूल, ऊर्जा व अपारंपरिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण, शालेय शिक्षण, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय ही खाती देण्यात आली आहेत.
  • सुभाष राजाराम देसाई : यांच्याकडे उद्योग आणि खनिकर्म, उच्च व तंत्रशिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, कृषी, रोजगार हमी योजना, फलोत्पादन, परिवहन, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्ये, राजशिष्टाचार, भूकंप पुनर्वसन, बंदरे आणि खारभूमी विकास ही खाती सोपविण्यात आली आहेत.
  • जयंत राजाराम पाटील : यांच्याकडे वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, सार्वजनिक आरोग्य, सहकार व पणन, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, कामगार, अल्पसंख्याक विकास ही खाती देण्यात आली आहेत.
  • डॉ. नितीन काशिनाथ राऊत : यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), आदिवासी विकास, महिला व बाल विकास, वस्त्रोद्योग, मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण ही खाती राहणार आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...