Agriculture news in marathi, Departure In UmberShet Khar dam | Agrowon

उंबरशेत खार बंधाऱ्याला भगदाड

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील उंबरशेत येथील खारे पाणी अडवणाऱ्या बंधाऱ्याला भगदाड पडल्यामुळे किनाऱ्यावरील पाणी भातशेतीमध्ये घुसले. यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील उंबरशेत येथील खारे पाणी अडवणाऱ्या बंधाऱ्याला भगदाड पडल्यामुळे किनाऱ्यावरील पाणी भातशेतीमध्ये घुसले. यामध्ये शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

सावित्री खाडी लगतचीही उंबरशेत गावाची शेकडो एकर जमीन खारे पाणी शेतात शिरल्याने नापीक बनत आहे. भरतीचे पाणी अडविण्यासाठी आवश्यक असणारा प्रतिबंधक बांध उभारला होता. खाडी लगतच्या शेकडो एकर शेतीवर उंबरशेत, पणदेरी गावाची उपजीविका अवलंबून आहे. पाणथळ क्षेत्रामुळे येथील शेतकरी भात, पावटा, मुळा, उडीद, तूर अशी बारमाही उत्पादने घेतात. मात्र या पाण्यामुळे उत्पादन घटले, शेती ओसाड पडू लागली. त्यातच जंगली श्वापदांचा त्रास होऊ लागला. यामुळे बळिराजा मेटाकुटीला आला आहे. 

नापीक क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, उर्वरित शेतीही त्याला बळी पडणार आहे. यावर उपाययोजना म्हणून पेवे-उंबरशेत धूप प्रतिबंधक बंधारा अत्यावश्यक बनला आहे. खारभूमी विकास विभाग याकडे लक्ष देईल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

उंबरशेत, कोंडगाव येथील खारभूमी बंधारे विशेष बाब म्हणून घेणार असल्याचे खारभूमी प्राधिकरण व परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी गतवर्षी मुंबई येथे सांगितले होते. त्यामुळे परिसरातील उर्वरित भात शेती वाचण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र यावर अद्यापही ठोस काही झाले नाही. त्यामुळे पुन्हा मंत्री व अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे ग्रामस्थ नरेश बोर्ले यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...