पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे

पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे
पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी : डॉ. कुटे

नाशिक  : पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीकरचना करावी लागेल. देशातील आंतरराज्यीय पीक व्यापारात तेरा टक्के आभासी पाण्याची देवाणघेवाण होत आहे. आभासी पाणी व्यापाराला योग्य पीक, वस्तूंची यादी करावी लागेल. त्याचा कृती आराखडा करत धोरण निश्‍चित करावे लागेल. त्यासाठी जलचलनाला अनुसरून पीकरचना ठरवावी लागेल असे प्रतिपादन कर्मवीर काकासाहेब वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुनील कुटे यांनी केले. ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त आय. एम. आर. टी. महाविद्यालयात झालेल्या व्याख्यानात ते ‘वॉटर करन्सी’ याविषयावर बोलत होते.यावेळी श्री. माने यांनी नागरीकरण आणि पाण्याचा वापर या ज्वलंत विषयावर चर्चा व्हावी म्हणून व्याख्यान आयोजित करण्यात आल्याची माहिती दिली.  या कार्यक्रमासाठी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमाताई पवार प्रमुख अतिथी होत्या.‘सकाळ'' च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, के. टी. एच. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गायकवाड, ‘मविप्र’चे शिक्षणाधिकारी डॉ. पाटील, प्रा. संजय शिंदे, प्राचार्य डी. के. मुखेडकर, विलास देशमुख, डॉ. आय. बी. चव्हाण आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com