एफआरपीवरील व्याज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, साखर आयुक्तालयाचे निर्देश

उशिराच्या एफआरपीवर व्याजाची आकारणीची ही पहिलीच घटना आहे. तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा आहे. यात कुणी जाणीवपूर्वक चालढकलपणा, वेळकाढूपणा केला, तर अवमान याचिका दाखल करू. - प्रल्हाद इंगोले, सदस्य, ऊस दर नियंत्रण मंडळ.
Deposit interest on FRP to farmers account, Sugar Commissioner's instructions
Deposit interest on FRP to farmers account, Sugar Commissioner's instructions

नांदेड : नांदेड विभागातील २० साखर कारखान्यांकडील सन २०१४-१५ च्या गाळप हंगामामधील विलंबित एफआरपीवर १५ टक्के व्याजाची आकारणी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यांनी शुक्रवार (ता. ३१) पर्यंत प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे अहवाल सादर करावे. साखर कारखान्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत व्याजाची रक्कम ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा करावी, असे निर्देश साखर आयुक्तालय स्तरावरून देण्यात आले.

नांदेड विभागातील साखर कारखान्यांकडे असलेल्या २०१४-१५ च्या गाळप हंगामातील विलंबित एफआरपी रकमेवर व्याज आकारणी करावी, या मागणीसाठी ऊस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती. या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार साखर आयुक्तलय स्तरावरून या कारखान्यांकडील थकीत एफआरपी वर १५ टक्के व्याजाची आकारणी करण्यासाठी विशेष लेखा परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली. 

कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांनी व्याज आकारणीसाठी लागणारे संपूर्ण रेकॉर्ड, माहिती सादर करणे बंधनकारक आहे. विशेष लेखा परीक्षकांनी विलंबित एफआरपी रकमेवर १५ टक्के व्याजाची आकारणी करून अहवाल शुक्रवारपर्यंत प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे सादर करावा. व्याजाची खातरजमा करून साखर कारखान्यांना येत्या १० फेब्रुवारीपर्यंत लेखी पत्राद्वारे कळवा. कारखान्यांनी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या खात्यात १५ टक्के व्याजाची रक्कम येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत जमा करावी. त्याबाबतचा अहवाल २० फेब्रुवारीपर्यंत प्रादेशिक साखर सहसंचालकांना सादर करावा, असे निर्देश तत्कालीन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी नांदेड आणि सोलापूर येथील प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com