‘द्वारकाधीश’चे पेमेंट उस उत्पादकांच्या खात्यात जमा

‘द्वारकाधीश’चे पेमेंट उत्पादकांच्या खात्यात जमा
‘द्वारकाधीश’चे पेमेंट उत्पादकांच्या खात्यात जमा

नाशिक  : बागलाण तालुक्यातील शेवरे येथील द्वारकाधीश साखर कारखान्याचे २०१९-२० गळीत हंगाम २८ नोव्हेंबर २०१९ रोजी सुरू करण्यात आला होता. १५ डिसेंबर पर्यंत पहिल्या पंधरवड्याचे ऊस पेमेंट रुपये २५०० रु. प्रति मेट्रिक टन याप्रमाणे ऊस उत्पादकांच्या बँक खात्यामध्ये मंगळवार (ता. २४) रोजी जमा करण्यात आले असल्याची माहिती अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी दिली.  चालू वर्षीच्या गळीत हंगामाप्रसंगी केंद्र शासनाचे ऊसदर देण्यासंबंधी माहिती देताना कारखान्याचे या हंगामातील रास्त व किफायतशीर एफ. आर. पी. रुपये २४७८.७४ प्रति. टन येते. तथापि मागील वर्षाच्या कोरडा दुष्काळ व चालू वर्षाच्या ओल्या दुष्काळामुळे ऊस उत्पादक आर्थिक अडचणीत असताना उसाचे पेमेंट एक रकमी रुपये २५०० रु. प्रति मेट्रिक टन याप्रमाणे अदा करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पुरेसे वेळेत पेमेंट देण्यात आले आहे. कार्यक्षेत्रात पुरेसा व चांगल्या प्रतीचा ऊस उपलब्ध करून साखर उतारा वाढवणे व ऊस वाहतूक खर्चात बचत करून ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचे व्यवस्थापनाचे धोरण आहे. ऊस विकासामध्ये अद्ययावत माती परीक्षण प्रयोगशाळा उभारणी केलेली आहे. परीक्षणानुसार पिकासाठी योग्य सेंद्रिय व रासायनिक खत मात्रा, त्रिस्तरीय बेणेमळा योजनेतून प्रमाणित ऊस बियाणे, स्वतंत्र विकास कक्ष, व्ही. एस. आय. तज्ज्ञांचे मार्गदर्शन इत्यादी कार्यान्वित आहेत. या उपक्रमामधून उसाचे "एकरी १००मे. टन ऊस उत्पादनाचे ध्येय" हे ब्रीदवाक्य साध्य करीत आहोत. त्याचा उत्पादकांनी लाभ घेण्याचे आव्हान अध्यक्ष सावंत यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com