Agriculture news in marathi deposits of three ration shops is confiscated in Solapur | Agrowon

सोलापुरातील तीन स्वस्त धान्य दुकानांची संपूर्ण अनामत जप्त

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 एप्रिल 2020

सोलापूर  : ‘लॉकडाउन’च्या कालावधीत रेशन कार्ड धारकांना धान्याची पावती दिली नाही. त्यामुळे शहरातील तीन स्वस्त धान्य दुकानांची संपूर्ण अनामत रक्क्म जप्त करण्यात आली. ही कारवाई अन्न धान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी केली

सोलापूर  : ‘लॉकडाउन’च्या कालावधीत रेशन कार्ड धारकांना धान्याची पावती दिली नाही. त्यामुळे शहरातील तीन स्वस्त धान्य दुकानांची संपूर्ण अनामत रक्क्म जप्त करण्यात आली. ही कारवाई अन्न धान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी केली. 

‘लॉकडाउन’च्या कालावधीत राज्य शासनाने रेशन कार्ड धारकांना विविध योजनेंतर्गत धान्य वितरणाच्या सूचना दिल्या होत्या. तथापि, जिल्ह्यातील काही रास्तभाव दुकानदार नियमानुसार धान्य वाटप करत नाहीत. तसेच रेशन कार्ड धारकांना पावती देत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे शहरातील परिमंडळ अ विभागातील जमात पंजाब तालीम, रास्त भाव दुकान क्रमांक अ-८ आणि शांताबाई बाबुराव म्हमाणे अ-१ आणि परिमंडळ क विभागातील मजिकार्जून बनसोडे रास्तभाव दुकान क्रमांक ५७ या तीन दुकानांच्या अनामत रक्कम जप्त करण्यात आल्या, असे पाटील यांनी सांगितले. 

माढा तालुक्यातील मौजे पिंपळनेर येथील गंगामाई महिला बचत गट आणि पी. एस. लोकरे यांच्या रास्त भाव दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले. बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथील दुकान क्रमांक ६१ निलंबित करण्यात आले. धान्य वाटपात अनियमितता, मूळ शिधापत्रिका आणि ऑनलाईन शिधापत्रिकेच्या नावात बदल, अशा त्रुंटीमुळे जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून ही कार्यवाही करण्यात आली, असे पाटील यांनी सांगितले. 
 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...