कृषी कायद्यांविरुद्ध ‘वंचित’चे आंदोलन

नांदेड : शेतकऱ्यांच्या विरुद्ध जाचक कायदे करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (ता. १७) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
  'Deprived' movement against agricultural laws
'Deprived' movement against agricultural laws

नांदेड : शेतकऱ्यांच्या विरुद्ध जाचक कायदे करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (ता. १७) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 

मागील काही दिवसांपासून देशातला शेतकरी राजधानीत आंदोलन करत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना दहशतवादी व देश विरोधी ठरविण्याचे षडयंत्र करत आहे. या काळ्या कायद्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आहे. शेतकऱ्यांच्या बाजूने लढा देण्यासाठी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशाने राज्यभर वंचित बहुजन आघाडीने लढा उभारला आहे. 

राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकरी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांच्या विरोधात लादण्यात आलेल्या जाचक कायद्यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. हे कायदे रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

आघाडीचे राज्य प्रवक्ते फारूक अहमद, गोविंद दळवी, मराठवाडा सदस्य डॉ. संघरत्न कुरे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगोले, शिवा नरंगले, महिला जिल्हाध्यक्ष दैवशाला पांचाळ, नामदेव आईलवाड, डॉ. सुदर्शन भारती, महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड, आयुब खान पठाण, महासचिव शाम कांबळे, साहेबराव बेळे, बिलाल शेख, ॲड. कमलेश चौदांते आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com