agriculture news in marathi Deputy CM positive about electricity tariff concession | Page 3 ||| Agrowon

वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 2 ऑक्टोबर 2021

राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या वीजबिल सवलतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली.

कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी उपसा जलसिंचन योजनेच्या वीजबिल सवलतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक निर्णयाची ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिल्याची माहिती राज्य इरिगेशन फेडरेशनच्या प्रतिनिधींनी दिली. 

सहकारी पाणीपुरवठा संस्था अनेक अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आहेत. या संस्था ३० ते ४० वर्षांपूर्वीच्या असल्याने पाइपलाइन लिकेज व मशिनरी दुरुस्ती खर्चात वाढ झाल्याने नवीन वीज दरवाढ परवडणारी नाही. राज्य शासनाचा पूर्वी प्रमाणेच अनुदान देऊन सवलतीचा दर कायम ठेवावा, अशी मागणी राज्य इरिगेशन फेडरेशनच्या प्रतिनिधींनी केली. उपसा जलसिंचन योजना दरमहा वेळेवर बिल भरतात, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. सवलतीच्या मागणीवर ‘ऊर्जा’ व ‘महावितरण'ने अहवाल सादर केला. त्यात सवलतीची रक्कम राज्य शासनाने ‘महावितरण'ला दिल्यास पूर्वीप्रमाणे सवलतीचा दर कायम ठेवण्यास सहमती दर्शवली. 

बैठकीला ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम थोपटे, आमदार अरुण लाड, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनचे आर. जी. तांबे, विक्रांत पाटील- किणीकर, जे. पी. लाड, अंकुश जगताप, ‘महावितरण’चे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ऊर्जा विभागाचे सचिव दिनेश वाघमारे आदी उपस्थित होते. 


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कापसाच्या खेडा खरेदी दरात वाढजळगाव : खानदेशात कापसाची किमान ८६०० व कमाल ९२००...
तमिळनाडूला पावसाने झोडपले..चेन्नई : तमिळनाडूत चेन्नईसह अनेक जिल्ह्यात...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; सरकारकडून...मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये...
‘आत्मा’ कर्मचाऱ्यांची पगार कपातीविरोधात...नागपूर : केंद्र सरकारनेच नव्या मार्गदर्शक...
तेलंगणातून भाताचे खरेदीसाठी मुख्यमंत्री...हैदराबाद : केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात...
२०२० मध्ये व्यापाऱ्यांच्या आत्महत्या...नवी दिल्ली : गेली दोन वर्षे कोरोनाचा विळखा...
सांगलीच्या परवान्यावर कर्नाटकात परस्पर...सांगली : येथील वसंतदादा मार्केट यार्डातील संतगोळ...
सिंधुदुर्गात पाऊस सुरूच, शेतकऱ्यांच्या...सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गात गेल्या सहा-सात...
लखीमपूर खेरी हिंसाचार : माजी...नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील...
मत्स्यपालनामध्ये खाद्याचा योग्य वापर...माशांच्या वाढीसाठी सकस व प्रथिनयुक्त आहाराची गरज...
वातावरण बदलाविरुद्ध क्रांतीच्या तीन दिशाभारताच्या उत्तर भागामधील सर्वांत जास्त...
हिरवी मिरची, कोबी, शेवगा दरांत वाढपुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही...पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊससिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्याच्या काही भागांत शनिवारी...
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा तीस टक्के...रत्नागिरी ः दिवाळीत पडलेल्या मुसळधार पावसामुळे...
नाशिकमध्ये अवकाळीमुळे भात पिकांचे मोठे...नाशिक : ऐन दिवाळीच्या सणाला हवामान विभागाने...
गडचिरोलीत कृषिपंपांना २४ तास वीजपुरवठा...गडचिरोली ः वीज वितरणचे वरिष्ठ अधिकारी कृषिपंपाला...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा परतावा आजपासून...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी...
परभणी जिल्ह्यात खतांची मागणी वाढलीपरभणी ः परभणी जिल्ह्यात शनिवार (ता.६) अखेर पर्यंत...
पुणे जिल्ह्यात ढगांमुळे शेतकरी धास्तावलेपुणे ः परतीच्या पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका...