agriculture news in Marathi deregulation in paddy procurement Maharashtra | Agrowon

धान खरेदीत मोठी अनियमितता

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून रब्बी हंगामातील धान खरेदी मोठी अनियमितता झाल्याचा खुलासा खुद्द चौकशी समितीने केला आहे.

गोंदिया: जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून रब्बी हंगामातील धान खरेदी मोठी अनियमितता झाल्याचा खुलासा खुद्द चौकशी समितीने केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भातील अहवाल सादर करण्यात आला असून सातबाराच्या झेरॉक्सवरच धान खरेदी झाल्याचे यात नमूद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने यावर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामात ५७ लाख क्विंटल धान खरेदी केली. कृषी विभागाने धान लागवड क्षेत्र  आणि उत्पादकता याच्या सरासरीपेक्षा किती तरी पट अधिक खरेदी झाली. परिणामी छत्तीसगड तसेच मध्यप्र देशातील धानाची जिल्ह्यातील केंद्रावर विक्री झाल्याच्या शक्यतेला दुजोरा मिळत होता. त्यामुळेच या प्रकरणी चौकशीची मागणी होऊ लागली. 

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणी चौकशीचे निर्देश दिले. त्यानंतर  अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी समिती गठित करण्यात आली. या समितीने पंधरा दिवस चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. यात धान्य खरेदीत मोठ्या प्रमाणात अनागोंदी झाल्याचे नमूद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. 

गोरेगाव, अर्जुनी मोरगाव, गोंदिया तालुक्यातील धान्य खरेदी केंद्रावर उत्पादनापेक्षा एक ते दीड लाख क्विंटल अधिक खरेदी करण्यात आली आहे. धान खरेदीत नियमितता असावी यासाठी कोणत्या केंद्रावर किती गाव सलग्न असतील हे ठरवून देण्यात आले होते. मात्र, खरेदी केंद्रांना जी गावे जोडून देण्यात आली होती. त्या गावा व्यतिरिक्त इतर गावातील, तालुक्याबाहेरील गावातून धान खरेदी करण्यात आली. सातबारावर तलाठ्याची बनावट स्वाक्षरी करून धानाची विक्री करण्यात आली.

ज्यांच्या शेतात धान लागवड नव्हती त्यांचाही सातबारा धान विक्रीसाठी जोडण्यात आला. सातबाराच्या झेरॉक्सवर देखील मोठ्या प्रमाणावर धानाची खरेदी करण्यात आली. सातबारावर सिंचनाची नोंद करीत वाढीव उत्पादकता असल्याचे भासवत या माध्यमातून देखील प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे प्रकार काही ठिकाणी घडले. चौकशी समितीच्या पाहणीत हे सारे गैरप्रकार उघड झाले असून समितीने आपला १५ पाणी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. आता  जिल्हाधिकारी या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एका सातबारावर अनेक ठिकाणी विक्री
सातबारा असल्याशिवाय धान विक्री करता येत नाही. मात्र, काही व्यापाऱ्यांनी बनावट सातबारा तयार करून त्याच आधारावर अनेक केंद्रावर धानाची विक्री केली, असेही चौकशीत समोर आले आहे.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...
बंदर, सीमेवरील कांदा निर्यातीचा मार्ग...नाशिक: निर्यातबंदीमुळे मुंबईतील जेएनपीटी बंदरावर...
नाचणी, भाजीपाला लागवडीतून महिला गट झाला...गावातील ७५ टक्के जमीन कातळाची, उरलेला भाग डोंगराळ...
पीककर्ज वाटपात राज्यात कोल्हापूर प्रथम...कोल्हापूर : जिल्ह्याकरिता पीक कर्जाचे वार्षिक...
कृषी विधेयकांना वाढता विरोधनवी दिल्लीः देशभरात ठिकठिकाणी विशेषतः पंजाब आणि...
तंबी देताच फळपिकांची विमा भरपाई झाली...पुणे: फळपिक विमा योजनेतील अडवून ठेवलेली नुकसान...
कांदा उत्पादकांची सावध चाल नाशिक: केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचे धुमशान पुणे ः मराठवाड्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे....
ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी निवडणूक...मुंबई: कोरोनामुळे स्थगित करण्यात आलेल्या आणि...
हलक्या पावसाची शक्यता पुणे ः बंगाल उपसागराच्या ईशान्य परिसरात उद्या (ता...
शेतकऱ्यांना उभारी देणारी संत ज्ञानेश्‍...किनखेडा (ता.रिसोड,जि.वाशीम) येथील प्रगतशील शेतकरी...