agriculture news in Marathi, The desert with water rubbing in orange strips | Agrowon

संत्रा पट्ट्यांत पाण्याच्या उपशामुळे वाळवंट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मार्च 2019

नागपूर ः अमरावती जिल्ह्याच्या वरुड, मोर्शी या संत्रा पट्ट्यांचे पाण्याच्या उपशामुळे वाळवंट झाले. त्यानंतर आता संत्रा, केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्‍याचीदेखील ड्रायझोनकडे वाटचाल सुरू झाली आहे. परिणामी सातपुडा पायथ्याशी असलेल्या अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी केळी आणि संत्रा काढण्यावर भर दिला आहे. 

नागपूर ः अमरावती जिल्ह्याच्या वरुड, मोर्शी या संत्रा पट्ट्यांचे पाण्याच्या उपशामुळे वाळवंट झाले. त्यानंतर आता संत्रा, केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्‍याचीदेखील ड्रायझोनकडे वाटचाल सुरू झाली आहे. परिणामी सातपुडा पायथ्याशी असलेल्या अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी केळी आणि संत्रा काढण्यावर भर दिला आहे. 

सर्वाधिक संत्रा लागवड क्षेत्रामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी वरुड, मोर्शी तालुक्‍यांची ओळख. या पिकासाठी पाण्याचा सातत्याने होणारा उपसा आणि तुलनेत पुनर्भरणाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे या भागाला आता ‘ड्रायझोन’ अशी ओळख मिळाली आहे. या भागात बोअरवेल खोदण्यावरदेखील बंदी लादण्यात आली आहे. बंदीमुळे चोरून लपून बोअरवेल खोदून देणाऱ्यांचा व्यवसाय फोफावला. त्यातूनच अनेक अवैध प्रकारही घडू लागले. याच वाटेवार आता अकोला जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगातील अनेक गावे जात असल्याची माहिती समोर आली आहे. 

या भागात संत्रा आणि केळीसारखी अधिक पाणी लागणारी पिके घेतली जातात. पाण्याअभावी ही पिके शेतकऱ्यांना सोडावी लागत आहेत. जूनमध्ये लागवड करण्यात आलेली केळी त्यानंतर चारच महिन्यांत अनेक शेतकऱ्यांनी काढून टाकली. संत्र्यांच्या मृग बहाराची फळे झाडांसह सुकली, अशी विदारक स्थिती या भागात निर्माण झाली आहे.

प्रकल्पदेखील कोरडे पडले
अकोट तालुक्‍यातील बहुतांशी गावे सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी आहेत. या भागात सरासरी एक किलोमीटरवर एक नाला आहे. पर्वतरांगांमधून येणारे पाणी नाल्याच्या माध्यमातून काही अंशी पुनर्भरणाचे काम करीत होते. गेल्या काही वर्षांत पावसाअभावी हे नाले वाहिलेच नाहीत. खिरकुंड, चिचपाणी, शहापूर-२, अंबाडी, पोपटखेड यासारखे प्रकल्पदेखील कोरडे पडले आहेत.

वर्ष १९७२-७३ मध्ये २० ते २५ फुटांवर पाणी लागत होते, त्या वेळी पहिल्यांदाच ओलिताचे प्रयत्न झाले. बैल बांधण्याकामी असलेल्या दोरानेच विहिरीतील पाणी उपसता येत होते. पाण्याचा सातत्याने होणारा उपसा आणि पुनर्भरणाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आज पाणीपातळी खोल गेली आहे. रुईखेड परिसरात ६०० फुटांपर्यंत बोअरवेल आज घेतल्या जातात. परंतू त्याला पाणी लागेल किंवा नाही याची गॅरंटी नाही. आमच्या गावात अनेकांनी पाण्याच्या शक्‍यतेने चार-पाच बोअरवेल खोदले, परंतू यातील एकालाही पाणी लागले नाही.
- प्रभाकरराव मानकर, प्रयोगशील शेतकरी, रुईखेड, ता. अकोट, जि. अकोला.

इतर अॅग्रो विशेष
महाराष्ट्राप्रमाणे आम्हालाही विकसित...पुणे : महाराष्ट्रातील शेतकरी पीक उत्पादन...
कांदा खाणाऱ्यांचा विचार करता, मग...नाशिक : कांद्यातील भाववाढीला आळा घालण्यासाठी...
द्राक्षपंढरीत गोड्या छाटण्यांना सुरवातनाशिक : चालू वर्षीच्या द्राक्ष हंगामाला सुरवात...
युरियाशिवाय शेती विचार रुजला तरच...नागपूर ः सेंद्रिय शेतीचा विचार गेल्या अनेक...
...अखेर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापनमुंबई ः गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या...
जलसमृद्धी बक्षीस योजनेतील चौथ्या आणि...पुणे : ॲग्रोवन जलसमृद्धी बक्षीस योजनेची सोडत...
नागपूर जिल्हा बॅंक घोटाळा निकाली...नागपूर ः नागपूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेतील...
शेतकरी कंपन्यांकडून हमीभावाने खरेदीची...पुणे : किमान हमीभाव खरेदीच्या कार्यक्रमात शेतकरी...
राज्यात उद्यापासून पावसाची शक्यतापुणे : राज्यात पावसासाठी पोषक हवामान होत असल्याने...
राज्यात नवे जलधोरणपुणे : राज्याच्या जुनाट जलधोरणाला अखेर मूठमाती...
कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी...नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता...
अनुदान अर्जांना १०० टक्के पूर्वसंमती...पुणे : कृषी विभागाच्या विविध योजनांमधील...
गुरुवारपासून पावसाचा जोर वाढणारपुणे : काहीशी विश्रांती घेतल्यानंतर अरबी...
कीडनाशके विक्री पात्रतेचा तिढा सुटलापुणे : देशात कीडनाशके विक्रीसाठी शैक्षणिक...
‘अमूल’कडून राज्यात कडवे आव्हानपुणे : राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत...
मॉन्सूनचा मुक्काम लांबणारपुणे : निम्मा सप्टेंबर उलटूनही परतीच्या...
अकोला जिल्ह्यात हजारो हेक्टर शेती नापेरअकोला ः अनियमित पावसाचा यंदा खरिपाला मोठा फटका...
नाशवंत शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी...पुणे : राज्यातील नाशवंत शेतमालाचे काढणीपश्‍चात...
शेतमाल प्रक्रिया उद्योगातून मिळाला...नांदेड जिल्ह्यातील बहाद्दरपुरा (ता. कंधार) येथील...
कुक्कुटपालनातून मिळाली स्वयंपूर्णतापरिसरातील बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन वळके...