दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर उत्साहात 

दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर उत्साहात 
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर उत्साहात 

कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या बैलजोड्यांसह प्रत्येक गोठ्यातील जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत दक्षिण महाराष्ट्रत देशी (महाराष्ट्रीय) बेंदूर साजरा झाला. 

सकाळपासूनच नद्या, पाणवठ्यावर जनावरांना धुण्यासाठी गर्दी झाली. पश्‍चिमेकडील अनेक गावातील गाव तलाव, ओढयांना पावसामुळे पाणी आल्याने गावागावांतील तलाव, ओढे-नाले जनावरांच्या गर्दीने भरून गेले होते. जनावरांची स्वच्छता केल्यानंतर बैलांना मसाला पाजून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. जनावरांना विविध रंगानी सजवून जनावरांचा डौल वाढविण्यसाठी अनेक ठिकाणी लगबग सुरू होती.

दुपारनंतर गावागावांत बैलांच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. हलगीच्या कडकडाटास आकर्षक पद्धतीने सजविलेल्या बैलांची रपेट गावागावांत सुरू होती. कर तोडण्याच्या कार्यक्रमांचेही विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते.

देशी बेंदरानिमित्त मंडळांनी सदृढ बैलजोडी स्पर्धांचेही आयोजन केले होते. सजविलेल्या बैलांसमवेत सेल्फीचा आनंदही बच्चेकंपनीनी साजरा केला. जिल्ह्यतील बहुतांशी ठिकाणी पाऊस चांगला झाल्याने याचा परिणाम यंदाच्या बेंदरावर जाणवला. पावसामुळे पेरणीची कामे झाल्याने उत्साह दिसून येत होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com