agriculture news in Marathi deshmukh brothers supply's green fodder Maharashtra | Agrowon

देशमुख बंधूंकडून उन्हाळ्यात जनावरांना मोफत हिरवा चारा 

मंगळवार, 4 मे 2021

जिल्ह्यातील सवडत येथील श्रीराम व शंकर अण्णाराव देशमुख हे भाऊ ऐन उन्हाळ्यात गावातील जनावरांना मोफत हिरवा चारा व पाणी पुरविण्याचे व्रत सांभाळत आहेत. त्यांच्या या कार्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. 

बुलडाणाः शेतकऱ्यांची दानशूरता, दिलदारपणा आजवर अनेकदा समाजाने बघितला. जिल्ह्यातील सवडत येथील श्रीराम व शंकर अण्णाराव देशमुख हे भाऊ ऐन उन्हाळ्यात गावातील जनावरांना मोफत हिरवा चारा व पाणी पुरविण्याचे व्रत सांभाळत आहेत. त्यांच्या या कार्याचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. 

आध्यात्मिक विचारांचा पगडा असलेल्या देशमुख बांधवांनी मागील काही वर्षांपासून जनावरांना मोफत चारा पुरविण्याचे काम हातात घेतले. सुरुवातीला त्यांनी गौरक्षण संस्थांमधील जनावरांसाठी चारा पोचवला. भैय्युजी महाराज स्थापित ऋषी संकुलातील जनावरांसाठी चारा दिला. आता गेल्या दोन वर्षांपासून ते शेतातच पंचक्रोशीतील जनावरांना हिरव्या चाऱ्याची सोय करतात. 

देशमुख यांच्याकडे २५ एकर शेती आहे. खरिपात कापूस बीजोत्पादन घेतात. इतरही पिकांचे चांगले उत्पादन काढतात. दानशूरपणातून त्यांनी गावातील जनावरांना हिरवा चारा पुरविण्याचे काम हातात घेतले. या कामातून मानसिक समाधान खूप मिळते, असे ते सांगतात. दरवर्षी सवडत ते शेगाव पायी वारी निघते. या वारीच्या नियोजनातही त्यांचा मोठा सहभाग राहतो. गजानन महाराजांचे निस्सीम भक्त, भैय्युजी महाराजांच्या विचारांचा पगडा जोपासणारे देशमुख बंधू आजच्या या व्यवहारिक काळात वेगळेपण जोपासत आहेत. 

रोज १५० जनावरांना देतात चारा 
दरवर्षी रब्बीत १० ते १२ एकर मका लागवड करतात. पीक अंतिम टप्प्यात आले की त्याची कापणी सुरु करतात आणि गाव, परिसरातील गरजूंना शेतात जनावरे घेऊन येण्याचा निरोप देतात. दररोज जवळपास १५० जनावरांना ते हिरवा चारा पुरवितात. एप्रिलमध्ये हा चारा वाटपाचा उपक्रम सुरु करून तो पाऊस पडेपर्यंत सुरु ठेवतात. शेतातील चारा संपला की दुसऱ्यांकडून विकत घेऊन जनावरांना खाऊ घालतात. सोयाबीन, तूर, हरभऱ्याचे कुटार विकत घेऊन जनावरांना पुरवितात. 
 

टॅग्स

इतर अॅग्रो विशेष
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
सिक्कीमचे ‘टेरेस फार्मिंग’ ठरतेय वरदानआशिया खंडामधील आनंदी नागरिकांचा देश म्हणजे भूतान...
पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पुणे : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताऊते या...
रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ पुणे ः केंद्र सरकारने रासायनिक खतांची दरवाढ...
लॉकडाउमुळे बेदाणा उत्पादकांची कोंडी सांगली ः जिल्ह्यातील तासगाव आणि सांगली बाजार...
नामपूर बाजार समितीत कांद्याला किमान दर...नाशिक : सोमवारी (ता. १०) सटाणा तालुक्यातील नामपूर...
खरिपात यंदा कपाशी, रब्बीत गहू चांगले...भेंडवळ, जि. बुलडाणा ः या हंगामात सर्वसाधारण...
विमा कंपन्यांनी गोळा केले २३ हजार कोटी...पुणे ः नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांना आधार...
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव...नगर : कामात अनियमिततेच्या कारणाने महात्मा फुले...
निर्यात केंद्रामुळे कृषी व्यापाराला...पुणे ः मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड...
ढगाळ हवामान, पावसाची शक्यतामहाराष्ट्रावरील हवेचा दाब १००२ हेप्टापास्कल इतके...
कोकणातील शेतीला नव्या संधींची दिशादापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
मुसळधार पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राची...