मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैना

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (ता. २१) अतिपाऊस बरसतो आहे. बुधवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना, बीड व हिंगोली जिल्ह्यांतील १७ मंडलांत अतिवृष्टी झाली.
The destroy of agricultural crops in Marathwada again
The destroy of agricultural crops in Marathwada again

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (ता. २१) अतिपाऊस बरसतो आहे. बुधवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना, बीड व हिंगोली जिल्ह्यांतील १७ मंडलांत अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेतीपिकांची पुन्हा एकदा दैना झाली आहे. नुकसानीच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्‍यता आहे.

मराठवाड्यात मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जालना, बीड व परभणी जिल्ह्यांतील १९ मंडलांत अतिपाऊस झाला. इतर जिल्ह्यांतील बहुतांश भागांत त्याने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पाऊस सुरूच होता. औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना जिल्ह्यातील ८ बीडमधील २ व हिंगोली जिल्ह्यातील एका मंडलात अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ३४.३ मिलिमीटर, जालना जिल्ह्यात ३६.६, बीड जिल्ह्यात २३.९ , लातूर १३.३ , नांदेड १२.२, परभणी १६.४, हिंगोली १०.९, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वांत कमी सरासरी १.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.  मराठवाड्यात संपूर्ण पावसाळ्यात सरासरी ६७९.५ मिलिमीटर पाऊस पडतो. तर जूनपासून आतापर्यंत अपेक्षित सरासरी ६३५.२ मिलिमीटरच्या तुलनेत ८५९.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

अपेक्षित पावसाच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात १४३ टक्‍के, जालना १६८.५ टक्‍के, बीड १५६.१ टक्‍के, लातूर ११५.७ टक्‍के, उस्मानाबाद ११७.७ टक्‍के, नांदेड १३१.९ टक्‍के, नांदेड १३२.४ टक्‍के, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी १२१.१ टक्‍के पाऊस झाला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनसह विविध पिकांच्या मुळावर हा पाऊस उठला असल्याचे चित्र आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com