Agriculture news in marathi, The destroy of agricultural crops in Marathwada again | Page 2 ||| Agrowon

मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैना

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 23 सप्टेंबर 2021

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (ता. २१) अतिपाऊस बरसतो आहे. बुधवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना, बीड व हिंगोली जिल्ह्यांतील १७ मंडलांत अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (ता. २१) अतिपाऊस बरसतो आहे. बुधवारी (ता.२२) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत औरंगाबाद, जालना, बीड व हिंगोली जिल्ह्यांतील १७ मंडलांत अतिवृष्टी झाली. या पावसामुळे शेतीपिकांची पुन्हा एकदा दैना झाली आहे. नुकसानीच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्‍यता आहे.

मराठवाड्यात मंगळवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत जालना, बीड व परभणी जिल्ह्यांतील १९ मंडलांत अतिपाऊस झाला. इतर जिल्ह्यांतील बहुतांश भागांत त्याने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. बुधवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत पाऊस सुरूच होता. औरंगाबाद जिल्ह्यातील ६, जालना जिल्ह्यातील ८ बीडमधील २ व हिंगोली जिल्ह्यातील एका मंडलात अतिवृष्टी झाली.

औरंगाबाद जिल्ह्यात सरासरी ३४.३ मिलिमीटर, जालना जिल्ह्यात ३६.६, बीड जिल्ह्यात २३.९ , लातूर १३.३ , नांदेड १२.२, परभणी १६.४, हिंगोली १०.९, तर उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वांत कमी सरासरी १.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 
मराठवाड्यात संपूर्ण पावसाळ्यात सरासरी ६७९.५ मिलिमीटर पाऊस पडतो. तर जूनपासून आतापर्यंत अपेक्षित सरासरी ६३५.२ मिलिमीटरच्या तुलनेत ८५९.९ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

अपेक्षित पावसाच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात १४३ टक्‍के, जालना १६८.५ टक्‍के, बीड १५६.१ टक्‍के, लातूर ११५.७ टक्‍के, उस्मानाबाद ११७.७ टक्‍के, नांदेड १३१.९ टक्‍के, नांदेड १३२.४ टक्‍के, तर हिंगोली जिल्ह्यात सरासरी १२१.१ टक्‍के पाऊस झाला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीनसह विविध पिकांच्या मुळावर हा पाऊस उठला असल्याचे चित्र आहे.
 


इतर अॅग्रो विशेष
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
प्रक्रिया उद्योगातून शेती झाली किफायतशीरमानकरवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील संगीता...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची... पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल...
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात...नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६...
अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या...अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल...
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...