Agriculture news in Marathi Destroyed vegetable crops in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके उद्ध्वस्त

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑक्टोबर 2020

सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला उत्पादकांचा जिल्हा म्हणून झाली आहे. अलीकडच्या काळात दुष्काळी पट्ट्यात देखील भाजीपाला लागवडीकडे कल वाढला आहे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भाजीपाला शेती उद्ध्वस्त झाली असल्याने सुमारे एक ते दीड कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला उत्पादकांचा जिल्हा म्हणून झाली आहे. अलीकडच्या काळात दुष्काळी पट्ट्यात देखील भाजीपाला लागवडीकडे कल वाढला आहे. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील भाजीपाला शेती उद्ध्वस्त झाली असल्याने सुमारे एक ते दीड कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे.

जिल्‍ह्यातील शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरुच आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. भाजीपाला उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता. त्यानंतर वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली. हळूहळू भाजीपाल्यास मागणी वाढू लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा नव्या जोमाने भाजीपाला लागवडीस सुरुवात केली.

जिल्ह्यात ढोबळी मिरची, वांगी, कारली, दोडका, यासह विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. भाजीपाल्याच्या क्षेत्रात वाढ होण्यास सुरुवात झाली. चार पैसे मिळू लागले. गेल्या महिन्यापूर्वी भाजीपाल्याला अपेक्षित दरही मिळू लागला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडीकडे वळालो होते. दरम्यान, दुष्काळी भागात टेंभू, म्हैसाळ आणि ताकारी उपसा सिंचन योजनेचे शाश्वत पाणी मिळू लागल्याने या भागात देखील भाजीपाला क्षेत्र वाढू लागले होते.

भाजीपाल्याने दररोज ताजा पैसा घरी येत होता. सगळं व्यवस्थित सुरु होतं. परंतू गेल्या चार ते पाच दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी झाली. भाजीपाल्याची पिके उध्दवस्त झाली. शेतात पाणी साचंल त्यामुळे भाजी, टोमॅटो, कारली, ढोबळी मिरची पिकांची मूळ कुज होण्यास सुरुवात झाली आहे. काढणीला आलेली पीक तशीच शेतात उभी आहेत. उभी असलेली पिकं काढून टाकण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता दुसरी लागवड करायची झाली तर पैसा कोठून आणायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. शेतीसाठी घातलेला पैसा सगळा पाण्यात गेला आहे.

सध्या बहुतांश सखल शेतात पाणीसाचून राहिलेले आहे. उभी असलेली पिकं काढणी जाणार. त्यानंतर वाफसा आल्यानंतर पुन्हा मशागती, मग लागवडीसाठी शेतकरी पुढे येणार, तोपर्यंत एक ते दोन महिन्याचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर भाजीपाल्याचे उत्पादन हाती येण्यासाठी एक ते दोन महिने जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उलाढाल थांबणार आहे.

आमच्या संस्थेमार्फत पुणे, मुंबई, बेळगाव आणि हैद्राबाद येथे भाजीपाला जात होता. परंतु अतिवृष्टीमुळे भाजीपाला शेती उद्ध्वस्त झाली आहे. नवीन लागवड होत नाही तोपर्यंत भाजीपाला पाठवणे अशक्य आहे.
- गजानन मोहिते, सचिव, उत्कर्ष भाजीपाला सहकारी संस्था, तुंग. ता. मिरज.

गेल्या तीन ते चार महिन्यांपासून भाजीपाला लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. त्यामुळे क्षेत्रातही काही प्रमाणात वाढ झाली होती. परंतु गेल्या चार ते पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले असून नवीन लागवडीसाठी महिन्याचा कालावधी जाण्याची शक्यता आहे.
- प्रकाश कदम, प्रविराम कृषी परिवार


इतर ताज्या घडामोडी
अकलूज येथील जनावरांचा बाजार बंदअकलूज, जि. सोलापूर : ‘‘अकलूज कृषी उत्पन्न...
‘अटल भूजल’मध्ये जळगावातील चार तालुके जळगाव : तेरा जिल्ह्यांत एक हजार ३३९...
खासदार गोडसेंकडून कृषी योजनांच्या...नाशिक : शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने...
करमाळ्यातील खडकीत बिबट्यासदृष्य...करमाळा, जि. सोलापूर : खडकी (ता. करमाळा)...
खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांचा कापूस घेऊ...नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यात कापसाचे उत्पादन...
चोपडा तालुक्यात `हतनूर`चे पहिले आवर्तन...गणपूर, जि. जळगाव : हतनूर धरणातून...
नांदेड जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर हरभरा नांदेड : ‘‘यंदाचा समाधानकारक पाऊस आणि...
हिंगोली जिल्ह्यात मर रोगामुळे तूर लागली...हिंगोली : जिल्ह्यातील अनेक भागातील फुलोरा, शेंगा...
पीकविम्यासाठी कृषी विभागाकडे संपर्क करा...नांदेड  : ‘‘ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने...
बटाटा लागवड ठरली फायदेशीरमहाळुंगे पडवळ : आंबेगाव तालुक्‍यातील कळंब, लौकी,...
साताऱ्यात ‘स्वाभिमानी’चे आंदोलनसातारा  : कृषी कायद्याविरोधात पंजाब व...
अकोल्यात रब्बीसाठी २९ कोटींचे कर्जवाटपअकोला : यंदाच्या रब्बी हंगामात लागवड ६५...
रब्बीच्या हंगामात विजेचा अडसररिसोड, जि. वाशीम  : सिंचन सुविधा निर्माण...
विमा कंपन्यांनी सरसकट भरपाई द्यावी - ...यवतमाळ :  जिल्ह्यातील ४ लाख ६७ हजार २१...
जागेअभावी संग्रामपुरात पाच दिवसांपासून...संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाकडे मका...
दोन दिवसांत निर्णय न झाल्यास केंद्र...कोल्हापूर : दोन दिवसांत दिल्लीतील...
गोंदियात ८५ हजार क्विंटल धान खरेदीगोंदिया : जिल्ह्यात हमीभावाने खरेदीसाठी सुरू...
अन्न उद्योग सक्षमीकरणात बारामती ‘...पुणे : सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचे...
‘ग्रामविकास’कडून वर्षभरात लोकाभिमुख...कोल्हापूर : गेल्या एक वर्षांच्या कालावधीत...
शेतकऱ्यांना अडविणारे राजकारणातून संपणारवर्धा : देशात शेतकऱ्यांना अडविणे आणि शेतकरीविरोधी...