गुलाबी बोंड अळीच्या नायनाटासाठी प्रात्यक्षिक

गुलाबी बोंड अळीच्या नायनाटासाठी कृषी विभागाचे उगवा येथे प्रात्यक्षिक
गुलाबी बोंड अळीच्या नायनाटासाठी कृषी विभागाचे उगवा येथे प्रात्यक्षिक

अकोला : गुलाबी बोंड अळीचा संपूर्ण नायनाट करण्याच्या उद्देशाने सिंदखेडराजा तालुक्यात कृषी विभागाने विविध उपाययोजना राबविल्या अाहेत. या तालुक्यातील उगवा येथे गुलाबी बोंड अळी निर्मूलनासाठी जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. 

तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांनी कपाशीवरील गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना विविध उपाययोजनांची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत सविस्तर माहिती दिली. कपाशीची फरदड न घेणे, कापूस श्रेडरचा उपयोग करून कपाशीचे अवशेष जमिनीत गाडणे, यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन उपाययोजना करा, असे अावाहन राठोड यांनी केले. 

कृषी विभागामार्फत यंत्र खरेदीसाठी, इतर बाबींसाठी असलेल्या योजनांची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. श्रेडरच्या माध्यमातून कपाशीचे अवशेष कसे नष्ट करावेत, याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखविण्यात अाले. या वेळी कृषी खात्याचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com