Agriculture news in marathi Destruction of vegetable crops in Parbhani district | Page 3 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

परभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील उभ्या भाजीपाला पिकांची नासाडी झाली आहे. बाजारभावातील तेजीच्या दिवसात दररोजच्या उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

परभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील उभ्या भाजीपाला पिकांची नासाडी झाली आहे. बाजारभावातील तेजीच्या दिवसात दररोजच्या उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

रविवार (ता.११) ते  गुरुवार (ता.२२) या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतात ओढे, नाले, नद्यांच्या पुराचे पाणी शिरले. त्यामुळे पालक, चुका, शेपू, कोंथिबीर आदी पालेभाज्या, टोमॅटो, वांगी, मिरची, कारले, दोडके, काकडी, चवळी, वाल, गवार, भेंडी, कोबी आदी भाजीपाला पिके पाण्यात बुडाली. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले. त्यामुळे उभी पिके कुजली आहेत. टोमॅटो, दोडके, कारले पिकांसाठी लावलेले बांबू आणि तारांचे मांडव मोडून पडले आहेत. जोरदार प्रवाहामुळे जमिनी खरडून गेल्या. विहिरी गाळाने भरल्या आहेत. 

ठिबक, तुषार संच वाहून गेले. परभणी तालुक्यातील सिंगणापूर, इटलापूर, बोरवंड, मिरखेल, देशमुख पिपंरी, खानापूर, वांगी, आसोला, आर्वी, गोविंदपूरवाडी आदी गावे, सेलू तालुक्यातील मोरेगाव, पाथरी तालुक्यातील माळीवाडा आदी प्रमुख भाजीपाला उत्पादक गावातील शेतकरी दररोज परभणी शहर तसेच प्रमुख बाजारपेठांच्या गावात भाजीपाला विक्री करतात. जुलै महिन्यात भाजीपाल्याचे दर वधारलेले असतात. परंतु यंदा अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. अधून-मधून पाऊस सुरुच आहे.

त्यामुळे शेतामधील पाण्याचा निचरा होत नाही. उत्पादन सुरु झाले असताना पिके हातची गेल्याने उत्पन्न बुडाले शिवाय खर्च वाया गेला आहे. पीकहानीचे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली. 

वर्षभर नियमित भाजीपाल्याचे उत्पादन घेत असतो. ढगफुटीमुळे एक एकरावरील विविध प्रकाराचा भाजीपाला, अर्धा एकर मिरची संपूर्णपणे सडून गेली आहे. शेतातून पाणी हटत नाही. नवीन लागवड लवकर शक्य नाही. दररोज ७०० ते ८०० रुपयाचे उत्पन्न बंद झाले.
- पंडित थोरात, खानापूर, ता. परभणी.

गावातील १० ते १५ एकरवरील विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांचे पुराच्या पाण्यामुळे नासाडी झाली. बांबू, तारांचे मांडव मोडून पडले. सिंचनाचे साहित्य वाहून गेले. विहरी गाळाने भरल्या. अतोनात नुकसान झाले.
- संभाजी गायकवाड, मिरखेल, ता. परभणी
 


इतर बातम्या
मराठवाड्यात नुकसानग्रस्त पिकांचे ६७.२६...औरंगाबाद : प्राथमिक अंदाजात जवळपास १५ लाख हेक्‍...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त...नांदेड : जिल्ह्यात जुले, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये...
जळगावातील धरणांत ८० टक्के उपयुक्त...जळगाव ः जिल्ह्यात पावसाने आतापर्यंत लावलेल्या...
ऊसबिलाचे तुकडे पाडू  दिले जाणार नाहीत...सातारा : ऊसबिलाचे तुकडे पाडू दिले जाणार नाहीत,...
'लासलगाव'च्या कांद्याला टपाल पाकिटावर...नाशिक : कांदा पिकासाठी लासलगाव परिसराची राष्ट्रीय...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...
मराठवाड्यात शेतीपिकांची पुन्हा दैनाऔरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा मंगळवारपासून (...
‘येलदरी’च्या १०, ‘सिद्धेश्‍वर’च्या १२...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांत बुधवारी (ता. २२...
‘मांजरा’ ४२ वर्षांत पंधरा वेळा भरलेलातूर ः लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांच्या...
परभणी : ‘ई-पीक पाहणी’वर ७७ हजार...परभणी ः ‘‘ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे यंदाच्या...
पुण्यातील धरणांच्या पाणलोटात पावसाचा...पुणे : गेल्या दोन दिवसांपासून धरणक्षेत्रात...
कापूस खरेदी नोव्हेंबरच्या पहिल्या...मुंबई : राज्यातील हंगाम २०२१-२२मधील शासकीय कापूस...
साताऱ्यात ई-पीक पाहणीस अल्प प्रतिसाद सातारा : सातारा जिल्ह्यात ई-पीक पाहणी प्रक्रियेस...
मराठवाड्यात पाऊस उठला पिकांच्या मुळावरऔरंगाबाद : आधी पावसाचा लहरीपणा आणि आता अतिपावसाने...
विदर्भात सोयाबीनला फुटले कोंब नागपूर : संततधार तसेच काही भागांत झालेल्या...
‘पीएम किसान’, ‘ई-पीक’चा तिढा सुटलापुणे ः महसूल व कृषी खात्यात तयार झालेल्या...
बुलडाण्यात ७४ टक्के शेतकऱ्यांना मिळाले...बुलडाणा : यंदाच्या खरीप हंगामासाठी नियोजित...
नांदेड : पीकविमा कंपनीच्या विरोधात धरणे...नांदेड : मुखेड तालुक्यात इफ्को टोकियो पीकविमा...
जनावरांचे बाजार कोल्हापुरात सुरू कोल्हापूर : कोरोनामुळे बंद असलेले जनावरांचे बाजार...