बंदीवानांनी पिकवला भाजीपाला

अकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत पिकवलेला भाजीपाला सध्या मोलाचा ठरत आहे. ‘कोरोना’मुळे लॉकडाऊन तसेच संचार बंदी असल्याने या काळात कर्तव्यावर असणारे आणि या संकटामुळे अडचणीत आलेल्यांना अन्न देण्यासाठी विविध अन्नछत्र सुरू करण्यात आले आहेत. या अन्नछत्रांना कारागृहात बंदीजनांनी पिकवलेला भाजीपाला देण्यात येत आहे.
Detainers grow vegetable productions
Detainers grow vegetable productions

अकोला ः येथील जिल्हा कारागृहात असलेल्या शेतीत पिकवलेला भाजीपाला सध्या मोलाचा ठरत आहे. ‘कोरोना’मुळे लॉकडाऊन तसेच संचार बंदी असल्याने या काळात कर्तव्यावर असणारे आणि या संकटामुळे अडचणीत आलेल्यांना अन्न देण्यासाठी विविध अन्नछत्र सुरू करण्यात आले आहेत. या अन्नछत्रांना कारागृहात बंदीजनांनी पिकवलेला भाजीपाला देण्यात येत आहे.  

जिल्ह्यात सध्या २५ पेक्षा अधिक आश्रयगृहे तर तितकीच कम्युनिटी किचन्स सुरू आहेत. त्यांना दररोज किमान १५ ते २० हजार लोकांना अन्न द्यावे लागते. त्यासाठी भाजीपाला अन्न धान्य उपलब्ध करावे लागते. त्यासाठी महसूल विभाग, पुरवठा विभाग, कृषी विभाग असे विविध विभाग मिळून काम करीत असतात. याठिकाणी लागणारी भाजीपाल्याची गरज ओळखून कारागृह अधीक्षक ए. एस. सदाफुले यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना विनंती केली व बंदीजनांनी पिकवलेला हा भाजीपाला शासकीय दराने कम्युनिटी किचनसाठी देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार हा भाजीपाला आता कम्युनिटी किचनला दिला जातोय.

अकोला कारागृहाकडे १४ एकर जमीन आहे. ही जमीन तीन विहिरींच्या पाण्यावर ओलिताखाली आणलेली आहे. परिश्रम करणारे बंदी, व्यवस्थापन करणारे कारागृह कर्मचारी ही शेती पिकवतात. गहू, सोयाबीन, तूर, कडधान्ये, मोहरी, बीट, नवलकोल, आंबटचुका, कढीपत्ता, कोथिंबीर, मुळा, कांदा, टोमॅटो, फ्लॉवर, पत्ताकोबी, भोपळा, दुधी भोपळा, पालक, वांगे, भेंडी, असा भाजीपाला पिकवला जात आहे.

असे आहेत शासकीय दर कांदे आठ रुपये प्रतिकिलो, कोथिंबीर २४ रुपये किलो, टोमॅटो ११ रुपये, फ्लॉवर १२,  वांगे १७, पालक १०, आंबटचुका ९, मुळा १०, दुधी भोपळा १२, नवलकोल १३, बीट १३ रुपये.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com