अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धार

अरुणा प्रकल्पाच्या घळभरणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात धरणात पाणीसाठा होईल. प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतर अपरिहार्य आहे. त्यासाठी आवश्‍यक सहकार्य प्रशासन करेल. - राजन डवरी,कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग.
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धार
अरुणाग्रस्तांचा गाव न सोडण्याचा निर्धार

सिंधुदुर्ग : अरुणा प्रकल्पात पाणीसाठा केला, तरी आम्ही गाव सोडणार नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला. तशा प्रकारची भूमिका त्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडली. प्रसंगी धरणात बुडून मरू, अशी टोकाची भूमिका प्रकल्पग्रस्तांनी घेतली आहे. त्यामुळे प्रशासन कोंडीत सापडल्याची स्थिती आहे.

हेत (ता. वैभववाडी) येथील अरुणा प्रकल्प घळभरणीच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. परंतु, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि त्यांना मोबदला अद्याप मिळाला नाही. त्यातच आता प्रशासन पंधरा दिवसांत स्थलांतर करा, असे आवाहन करीत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी मंगळवारी (ता. २१) सायंकाळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांची भेट घेतली. त्यांना चांगलेच धारेवर धरले. पुनर्वसन गावठाणात कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. राहण्यासाठी बांधलेल्या निवारा शेड दर्जाहीन आहेत. त्यामुळे जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे १०० टक्के पुनवर्सन होत नाही तोपर्यंत घळभरणी झाली असली, तरी पाणीसाठा करू नये. तसा प्रयत्न झाल्यास कायदा हातात घेऊ, असा इशारा प्रकल्पग्रस्तांनी अधिकाऱ्यांना दिला.

प्रकल्पग्रस्तांच्या या भूमिकेमुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांची कोंडी झाली. घळभरणी करून पाणीसाठा करावा, यासाठी शासनाकडून पाटबंधारे विभागाकडे तगादा लावण्यात आला होता. परंतु, आता प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेमुळे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

प्रकल्पस्थळी पोलिस बंदोबस्त

प्रकल्पग्रस्तांनी घेतलेला आक्रमक पवित्रा लक्षात घेऊन प्रशासनाने प्रकल्पस्थळी पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. त्यातच मंगळवारच्या प्रकारानंतर दंगा नियंत्रण पथक प्रकल्पस्थळी दाखल झाले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com