Agriculture news in marathi Determined to affluent Buldana District: Dr. Rajendra shigane | Agrowon

बुलडाणा जिल्हा संपन्न करण्यासाठी कटिबद्ध : पालकमंत्री डॉ. शिंगणे

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 28 जानेवारी 2020

बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाचा निधी खेचून आणत खर्ची घालण्यात येणार आहे. जिल्हा हा राज्यामध्ये सर्वच क्षेत्रांत अग्रेसर राहावा, यासाठी प्रयत्न करू. जिल्ह्याला सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,’’ असा विश्‍वास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. 

बुलडाणा  ः ‘‘जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासनाचा निधी खेचून आणत खर्ची घालण्यात येणार आहे. जिल्हा हा राज्यामध्ये सर्वच क्षेत्रांत अग्रेसर राहावा, यासाठी प्रयत्न करू. जिल्ह्याला सर्वतोपरी संपन्न जिल्हा करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,’’ असा विश्‍वास जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ते बोलत होते. 

डॉ. शिंगणे म्हणाले, ‘शासनाने एक एप्रिल २०१५ पासून ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत थकीत व्याजासह मुद्दल असलेले दोन लाख रुपये पीककर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्यात दोन लाख ९४० लाभार्थी शेतकऱ्यांना १४० कोटी ७४ लाख रुपये लाभ होणार आहे.’ 

‘जिल्ह्यात रोजगार हमी योजनेमधून आत्तापर्यंत ६२ हजार २०० व्यक्तींना रोजगार देण्यात आला आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात रोहयो अंतर्गत १३१२ कामे सुरू असून, त्यावर सहा हजार ८४५ मजुरांची उपस्थिती आहे. मातृतीर्थ सिंदखेडजा येथील ऐतिहासिक स्थळांचा विकास करण्यासाठी राज्य शासन सिंदखेड राजा विकास आराखडा राबवित आहे. तसेच लोणार पर्यटन विकास आराखडाही राबविण्यात येत आहे.  जिल्ह्यात बोरखेडी, दुर्गबोरी, निम्न ज्ञानगंगा, दिग्रस लघुप्रकल्प पूर्ण करण्यात आले असून तीन हजार ५४२ हेक्टर सिंचन निर्माण झाले आहे’, असा दावा डॉ. शिंगणे यांनी केला. 


इतर ताज्या घडामोडी
सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५...पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी...
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...