Agriculture news in marathi, Determined to rehabilitate floods : Subhash Deshmukh | Agrowon

पूरबाधितांचे पुनर्वसन करण्यास कटिबद्ध :सुभाष देशमुख

टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 ऑगस्ट 2019

सोलापूर : ‘‘दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील काही गावांमध्ये पूरस्थिती उद्भवल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सध्या त्याचे पंचनामे सुरू आहेत. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून अनेकांना तत्काळ भरपाई मिळाली आहे. उर्वरित पंचनामे पूर्ण होताच तीही मदत दिली जाईल. पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणे हा आमचा प्राधान्याचा विषय आहे,’’ असे मत मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

सोलापूर : ‘‘दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील काही गावांमध्ये पूरस्थिती उद्भवल्याने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. सध्या त्याचे पंचनामे सुरू आहेत. पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून अनेकांना तत्काळ भरपाई मिळाली आहे. उर्वरित पंचनामे पूर्ण होताच तीही मदत दिली जाईल. पूरग्रस्तांचे पुनर्वसन करणे हा आमचा प्राधान्याचा विषय आहे,’’ असे मत मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.

भीमा नदीपात्रात उजनी व वीर धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील काही गावांना पुराचा वेढा पडला होता. त्यात वडापूर, कुसूर, खानापूर, तेलगाव, भंडारकवठे, बाळगी, सादेपूर, लवंगी, कारकल, औज (मं), कुरघोट, टाकळी येथे देशमुख यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या. शेतकऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. स्थलांतरित नागरिकांची विचारपूस केली. 

खानापूर येथील कुटुंबांचे तसेच तेलंगावसह अन्य काही गावांतील कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करू, असे सांगून प्रशासनालादेखील योग्य ती मदत देण्याच्या सूचना देशमुख यांनी दिल्या. वडापूर येथे अनेक शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमधून लाभ मिळाला असून, काही जण लाभाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. प्रत्येक शेतकऱ्याने आपले बॅंक खाते व्यवस्थित देण्याचे आवाहन या वेळी देशमुख यांनी केले. प्रसंगी चर्चेत गावकऱ्यांनी कांदा अनुदान, बॅरेजेसची त्रुटी पूर्ण करून कामाची गती वाढविणे, प्रलंबित कर्जमाफी, असे उर्वरित विषय मांडले.

भंडारकवठे गावातील पंचनामे झाले असून, पूरबाधित कुटुंबांना मदत मिळाली आहे. तेलगावमधील लोक बाधित आहेत. सर्वांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. बाळगी, सादेपूर, कारकल कुटुंबांना लाभ दिला आहे. औज (मं)  लोकांना मदत मिळाली आहे. कुरघोट लोकांना मदत, टाकळी  लोकांना मदत मिळाली आहे, अशी माहिती या वेळी संबंधित विभागाने दिली. या वेळी प्रांतधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


इतर बातम्या
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
शेतकऱ्यांची अडवणूक झाली, तर...नगर : ‘‘शेतकऱ्यांसाठी काम करणे याला आपण सर्वांनी...
अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच पूरस्थिती...मुंबई : अतिवृष्टी आणि अतिक्रमणामुळेच...
शेतमालाचे ऑनलाइन तारण कर्ज होणार उपलब्ध...मुंबई : टाळेबंदी कालावधीत शेतकऱ्यांना राज्य वखार...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
मॉन्सून अरबी समुद्रात; सोमवारपर्यंत...पुणे  : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
उद्यापासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज;...पुणे : राज्यात अक्षरशः भाजून काढणाऱ्या उन्हापासून...
सहकाराच्या त्रिस्तरीय रचना मोडण्यास...पुणे : राज्यातील काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
राज्यात ४० हजार टन दूध पावडर पडूनपुणे : राज्यात ४० हजार टन दूध पावडर (भुकटी) पडून...
टोळधाडीमुळे अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान :...नागपूर: टोळधाडीचा धोका अमरावती विभागात टळला असला...
पीककर्जासाठी हेलपाटे, भ्रष्ट...संग्रामपूर, जि. बुलडाणा : वेळ सकाळी साधारण...
`गोकुळ' ची ४५ लाख लिटर दुधावर प्रक्रिया कोल्हापूर ः लॉकडाउनच्या काळात कोल्हापूर...
मागणीपेक्षाही एक लाख क्विंटल बियाणे...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असले...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...