agriculture news in Marathi, devaqua drought condition is very bad | Agrowon

देगावात दुष्काळाचा फळबागांना मोठा फटका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

वाळूज, जि. सोलापूर : यंदाच्या भीषण दुष्काळाचा शेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. पाण्याअभावी मोहोळ तालुक्‍यातील देगाव (वा) येथे एकाच शेतकऱ्याची केशर आंब्याची तीन हजारांपेक्षा अधिक झाडे फळासकट जळून गेली आहेत. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. 

वाळूज, जि. सोलापूर : यंदाच्या भीषण दुष्काळाचा शेतीला सर्वाधिक फटका बसला आहे. पाण्याअभावी मोहोळ तालुक्‍यातील देगाव (वा) येथे एकाच शेतकऱ्याची केशर आंब्याची तीन हजारांपेक्षा अधिक झाडे फळासकट जळून गेली आहेत. कधी अस्मानी, तर कधी सुलतानी संकटामुळे शेतकरी पुरता हतबल झाला आहे. 

देगाव (ता. मोहोळ) येथील शेतकरी विजयकुमार पोतदार व रत्नमाला पोतदार यांच्या शेतातील ही परिस्थिती आहे. दुष्काळात फळबाग जगविण्यासाठी केलेले सर्व उपाय निष्फळ झाले आहेत. दोन विहिरी कोरड्याठाक पडल्या आहेत. पूर्वीचे तीन बोअर आटले आहेत. दोन महिन्यांपूर्वी नवीन घेतलेल्या बोअरच्या अर्धा इंच येणाऱ्या पाण्यावर ठिबकद्वारे झाडे जगविण्याचा प्रयत्न चालू आहे. १५ ते २० दिवसांपूर्वी पुन्हा ५०० फूट बोअर पूर्ण कोरडा गेला. त्यासाठी एकूण एक लाख १५ हजार रुपये पाण्यात गेले. जिवापाड जपलेली झाडे जळून जात असलेली पाहून काळीज तीळतीळ तुटत आहे, असे पोतदार यांनी सांगितले.

यावर्षीचा दुष्काळ हा १९७२पेक्षा भीषण असून वाळूज, देगावसह ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट सुरू असताना शेतातील पिके आणि फळबागा कशा जगवायच्या हा मोठा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. 
- विजयकुमार पाटील, ज्येष्ठ शेतकरी, देगाव (वा.) मोहोळ

अलीकडच्या काळात भूगर्भातील पाण्याचा उद्योग, शेती आणि पिण्यासाठी होणाऱ्या भरमसाट उपशामुळे जमिनीची पाणी पातळी कमालीची खालावली आहे. प्रत्येकाने बोअरचे जलपुनर्भरण करणे अत्यंत गरजेचे आहे. 
- हेमलता सोनवणे-व्हटकर, सदस्या, पाणी फाउंडेशन टीम


इतर बातम्या
जंगलातील वणव्यांचाही वटवाघळांना होतो...वटवाघळांसाठी रहिवासाचा ऱ्हास, वातावरणातील...
मराठवाड्यात साडेदहा हजार एकरांवर तुतीऔरंगाबाद : मराठवाड्यात यंदा ३० नोव्हेंबर...
जालना जिल्ह्यात रब्बी सिंचनाची वाट अवघडचजालना :  जायकवाडी प्रकल्पावरून...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत केळी...नांदेड : सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे...
आटपाडीत तीनशे हेक्‍टरवर फुलणार डाळिंब...आटपाडी, जि. सांगली : पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड...
गांडूळ खतनिर्मितीस प्रोत्साहन द्या : डॉ...कोल्हापूर  : ‘‘शेतकऱ्यांनी जमिनीचा पोत...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीच्या ४०...बुलडाणा ः यंदाच्या हंगामात जिल्ह्यात रब्बीसाठी...
अधिकारी कार्यालयात घुसवल्या बैलजोड्याअमरावती ः वारंवार अर्ज, विनंत्या करूनसुद्धा पांदण...
नाशिक जिल्ह्यातील बंद उपसा जलसिंचन...नाशिक : जिल्ह्यात सन १९९५ ते २००० या कालावधीत...
सातारा जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फोडणार...सातारा  ः साखर कारखान्यांची धुराडी पेटली...
प्रतिकूल हवामानामुळे पुणे जिल्ह्यात...पुणे  ः दर वाढल्याने पुणे जिल्ह्यातील अनेक...
प्रतिकूल हवामानाचा नगर जिल्ह्यातील गहू...नगर  ः जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून...
चंद्रपूर जिल्ह्यात ११ महिन्यांत ५०...चंद्रपूर  ः नापिकी, कर्जबाजारीपणा यातून...
हवामानाच्या पूर्व अंदाजासाठी पाषाण,...पुणे  ः पुणे शहरातील विविध ठिकाणी अनेकदा कमी...
बुलडाणा जिल्ह्याच्या भूजलपातळीत १.३९...बुलडाणा ः मागील काही वर्षांपासून जिल्हा सातत्याने...
पुण्यात १७ जानेवारीपासून पुष्प...पुणे  ः ॲग्री हार्टिकल्चर सोसायटी ऑफ...
नवी दिल्लीतील प्रदर्शनात जैविक खते,...पुणे  ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील ऊस...कोल्हापूर : शिरोळ, हातकणंगले तालुक्यांतील...
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सहा दिवस...मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या...
विठ्ठल मंदिरात मोबाईल बंदीपंढरपूर, जि. सोलापूर ः श्री विठ्ठल मंदिराच्या...