स्मार्ट शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करा : डॉ. ढवण

परभणी : ‘‘स्मार्ट शेतीसाठी उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करावा. कोरोनामध्ये डिजिटल मंचाच्या माध्यमातून विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी सक्षम होणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.
Develop digital technology for smart farming: Dr. Dhawan
Develop digital technology for smart farming: Dr. Dhawan

परभणी :  ‘‘स्मार्ट शेतीसाठी उपयुक्‍त डिजिटल तंत्रज्ञानाचा विकास करावा. कोरोनामध्ये डिजिटल मंचाच्या माध्यमातून विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापकांनी सक्षम होणे आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन कुलगुरु डॉ. अशोक ढवण यांनी केले.

जागतिक बॅंक आणि भारतीय कृषी संशोधन परिषद पुरस्‍कृत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) आणि मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतर्फे (आयआयटी) ‘स्मार्ट कृषीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग’ यावर राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. सतीश अग्निहोत्री, प्रा. अमित अरोरा, प्रा. कवी आर्या, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्रा.डॉ. आर. पी. कदम, नाहेपचे मुख्य संशोधक डॉ. गोपाळ शिंदे, सहमुख्य संशोधक प्रा. संजय पवार आदी सहभागी झाले होते.

 डॉ. अग्निहोत्री यांनी स्मार्ट कृषीसाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा अनुप्रयोग यावर माहिती दिली. डॉ. गोखले म्हणाले, ‘‘मुंबई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील प्राध्यापकांनी दिलेले डिजीटल तंत्रज्ञान प्रशिक्षण विद्यापीठातील सहभागी विद्यार्थ्‍यी, प्राध्यापकांना उपयुक्त ठरेल.’’

प्रास्‍ताविक प्रा. अरोरा यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पवार यांनी केले. डॉ. कदम यांनी आभार मानले. प्रशिक्षणात कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ  सहभागी झाले होते. यशस्‍वीतेसाठी डॉ. अविनाश काकडे, खेमचंद कापगाते, रविकुमार, डॉ. हेमंत रोकडे, डॉ. रश्मी बंगाळे, जगदीश माने आदींनी पुढाकार घेतला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com